Ashok Gehlot: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. त्यांनी म्हटले की देशाने हे मान्य केल आहे की, मोदींसमोर केवळ राहुल गांधीच आहेत. आमचे सर्व नेते (अन्य पक्षाचे) माझ्या मनात त्या सर्वांसाठी आदर आहे, मात्र वस्तुस्थिती ही आहे की काँग्रेसच एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्याकडे राहुल गांधींच्या रुपात एक एक अद्भुत नेता आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे एक जननायक म्हणून सर्वांसमोर आले आहेत.
अशोक गहलोत म्हणाले की, काँग्रेस एक अखिल भारतीय आणि खरी राष्ट्रीय पार्टी आहे. ती प्रत्येक गावात आहे. भाजपा आता सत्तेत आहे, मात्र एक काळ होता जेव्हा त्यांच्याकडे संसदेत केवळ दोन जागा होत्या. म्हणून जागांच्या संख्येवर नाही गेलं पाहिजे, जेव्हा जनता ठरवते तेव्हा काहीही होऊ शकतं.
याशिवाय गहलोत यांनी सांगितले की, मुद्दे सर्वच पक्षांसाठी समान आहेत. अदाणी तर सोडा, अहिंसा, महागाई, बेरोजगारीचे मुद्दे आहेत. पंतप्रधान बोलण्यात चतुर आहेत, तर चतुराई कधीपर्यंत चालणार?
अशोक गहलोत म्हणाले की, संपूर्व विरोधक एकवटले आहेत. तुम्ही जनतेचा मूड कधीच नाही ओळखू शकत. मी तो इंदिरा गांधींच्या काळात पाहिला आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही इंडिया शायनिंग अॅण्ड फील गुडची चर्चा व्हायची. कुणालाही वाटत नव्हतं की वाजपेयी सरकार पराभूत होऊ शकतं. मात्र ते हारले. देश याचा साक्षीदार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करायल हवा. तुम्हाला(भाजपा) २०१४ मध्ये ३१ टक्के मतं मिळाली होती. २०१९ मध्ये तुम्ही ती वाढवली. मात्र तुम्हाला १०० टक्के मतं मिळालेली नाहीत. जनतेमधील एका मोठ्या वर्गाने तुमच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षांना मत दिलं आहे, त्यामुळे पंतप्रधांनांनी विरोधकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असंही अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.