पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून हार्दिक पटेल हे नाव पुढे आले.पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केले. त्यांच्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल यांनी आक्रमक होत भाजपा सरकारशी संघर्ष केला. शिक्षाही भोगली. त्यानंतर हार्दिक यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. आणि आता त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपाच्या वाटेवर आहेत. हार्दिक यांच्या भाजपा प्रवेशानंतरच्या घडणाऱ्या कृतींवर त्यांचे पाटीदार आंदोलनातील सर्व सहकारी लक्ष ठेवून असणार आहेत. हार्दिक पटेल त्यांच्या आंदोलनातील काही प्रमुख मागण्या आता भाजपा सरकारकडून कशा पूर्ण करून घेतात याकडे यावर त्यांच्या सहकाऱ्यांची पुढची भूमिका अवलंबून असणार आहे.
पाटीदार अनामत आंदोलन समिती ( पीएएएस) च्या नेतृत्वाखाली २०१५ साली झालेल्या आंदोलनानंतर अखेसरीस सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. पण, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने पाटीदार आंदोलकांवर देशद्रोहाच्या आरोपासह अनेक फौजदारी गुन्हे दाखल केले. या आंदोलना दरम्यान १४ आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हे आंदोलन शांत करण्यासाठी सरकारने प्रतिसाद देत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काही लोकांवरील गुन्हे मागे घेतले तर काही लोकांवर अजूनही गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे मागे घेण्यासह आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या घरातील प्रत्येकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी अजून कायम आहे.
सध्याचे ‘पीएएएस’ चे निमंत्रक आणि आंदोलनातील हार्दिक पटेल यांचे जवळचे सहकारी अल्पेश यांनी इंडियन एक्स्प्रेसला संगितले की “आम्ही हार्दिक पटेल यांना त्यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत. पाटीदार समाजाच्या तरुणांवरील फौजदारी खटले आणि शाहिद आंदोलकांच्या प्रत्येकी एका वारसाला सरकारी नोकरी या मागण्या अजूनही शिल्लक आहेत. त्या मागण्या मान्य नं झाल्यास हार्दिक पटेल यांना समजतील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल” ते पुढे म्हणाले की आम्हाला आशा आहे की हार्दिक भाजपाच्या माध्यमातून या मागण्या मान्य करून घेतील. तसे नं झाल्यास आम्ही हार्दिक पटेल यांच्या विरोधातही आंदोलन करू.
हार्दिक यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशवर त्यांच्या आंदोलनातील निकटवर्तीय सहकारी रेश्मा पटेल म्हणाल्या की “हार्दिक भाजपमध्ये कसे सहभागी होऊ शकतात? हे त्यांचे आत्मघातकी पाऊल आहे. काही दिवसांपूर्वी ते भाजपावर आरोप करत होते आणि आता ते त्याच भाजपात प्रवेश करून ते भाजपाचे कौतुक करत आहेत. आम्ही २०१७ मध्ये त्यांच्याविषयी जे बोलत होतो ते खरे असल्याचे बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे.
हार्दिक पटेल यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मात्र त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हार्दिक पटेल यांना त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांच्या रोशला सामोरे जावे लागेल.