दिगंबर शिंदे

सांगली : खानापूर आटपाडी मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविणारच अशी घोषणा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विट्यात झालेल्या एका कार्यक्रमात केली. त्यांच्या या घोषणेमुळे महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची कोंडी होते की, पडळकर यांचीच कोंडी होते हे पाहणेही मनोरंजक ठरणारे आहे.

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?

आमदार बाबर यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव तथा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी महायुतीतील राष्ट्रवादीशी संधान बांधले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. यामुळे येणारा काळ आमदार बाबर यांचा राजकीय प्रवास जोखमीचा की सबुरीचा ठरतो यावर या मतदार संघातील राजकीय गणिते ठरणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारमधून बाहेर पडून सूरत गाठली, त्यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे जे मोजके शिलेदार होते, यामध्ये आमदार बाबर यांचा समावेश होता. राज्य मंत्रीमंडळामध्ये आमदार बाबर यांची वर्णी लागणार असे आडाखे बांधले जात असतानाच मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यात आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्याने मंत्रीपदाची आशा मावळली आहे. आता लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले असून त्यानंतर विधानसभेचे रणांगण सुरू होणार आहे. यामुळे या निवडणुकीची तयारीही सुरू आहे. भाजपचे आमदार पडळकर यांनी यापुर्वी खानापूर-आटपाडीमधून विधानसभेची निवडणुक लढवली होती. मात्र, त्यांना यश आले नाही. या तुलनेत त्यांना २०१९च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीला या मतदार संघांने चांगली साथ दिली होती.

हेही वाचा… केंद्रीय मंत्र्यांनेच उघडकीस आणला भाजप आमदाराचा प्रताप

लोकसभा निवडणुकीतही पराभव झाल्यानंतर भाजपला मतदान करणार नाही अशी शपथ घेणार्‍या पडळयर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून बारामतीमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. या बदल्यात त्यांना विधान परिषदेची आमदारकी भाजपने दिली. आता त्यांचे तसे बरे चालले असतानाही त्यांना पुन्हा विधानसभेची आमदारकी हवी आहे की केवळ आमदार बाबर यांचा निवांतपणा त्यांना बोचत आहे हे कळायला मार्ग नाही. चार-दोन महिने गेले की ते निवडणुक लढविणार, गतवेळी आमदार बाबर यांना मदत करण्याची केलेली चूक पुन्हा करणार नाही असे वक्तव्य ते करीत असतात. या वक्तव्याची आमदार बाबर यांनाही सवय झाली असावी असे वाटते. मात्र, या मतदार संघात राजकीय खळबळ सातत्याने सुरू असते. बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील हे या मतदार संघातील पारंपारिक विरोधक. आताही अशीच लढत होणार अशी अपेक्षा असताना राष्ट्रवादीतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत पाटील गटाला नवे नेतृत्व स्वीकारावे लागले. कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडून अपेक्षित राजकीय पाठबळ त्यांच्या गटाऐवजी आमदार बाबर यांचे आटपाडीचे कार्यकर्ते तथा जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांना मिळत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा… कुणबी आरक्षणामुळे ठाणे, पालघरात युतीची कोंडी

माणगंगा कारखाना निवडणूक अविरोध करण्यात आमदार पाटील यांनी आपले वजन खर्ची घातल्याचे आणि कारखान्याचे गाळप सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेतून करण्यात येत असलेली मदत ही उदाहरणे दिली जात आहेत. यामुळे आमदार बाबर आता सावध झाले असून त्यांनी गेल्याच आठवड्यात आटपाडीच्या अमरसिंह देशमुख यांच्याशी जवळीक साधली आहे. तर दुसर्‍या बाजूला पाटील गटाचे वैभव पाटील यांनी मुंबईत जाउन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी जवळीक साधत विट्यात येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांच्याकडे या गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही दिली जाण्याची शययता वर्तवली जात आहे. महायुतीत जर जागा वाटपाचा प्रश्‍न आलाच तर त्यावेळी अजित दादांची भूमिका काय असेल हे सध्या तरी सांगता येत नसले तरी आमदार जयंत पाटील यांच्या खेळीने या मतदार संघाचे राजकारण अनाकलनीयतेच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा… काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या नमनालाच नगरमध्ये विसंवादाचे ग्रहण

दरम्यान, मतदार संघात कॉंग्रेसचे बळ फारसे नसले तरी कदम गटाकडून डॉ. जितेश कदम यांची चाचपणी सुरु आहे. एका मेळाव्यात कार्यकर्त्यांनी तशी मागणीही केली. यावर कदम गटाने अद्याप होकार दिला नसला तरी ठाम नकारही दिलेला नाही. यामुळे आमदार बाबर यांच्यासाठीची पुढील वाट बिकट ठरणारी वाटत आहे.