हिवाळी अधिवेशन संपले, पण त्यात नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा मात्र कायम आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्यावरून चिमटा काढला. त्यावर ‘बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले व शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उडी घेतली. 

हेही वाचा- फडणवीस यांच्या बीड दौऱ्यात मुंडे भगिनी गैरहजर

trouble for Mahayuti and Mahavikas Aghadi Because of the rebels in thane district
बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
bjp leaders diwali milan function chandrapur
भाजप नेत्याच्या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्याचे जोरगेवार, अहीर यांना निमंत्रण, मुनगंटीवारांना डावलले
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
halba community candidates in three constituencies in nagpur against bjp and congress
हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Indian Context of Federalism Loksatta Lecture Dhananjay Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ

अजित पवार यांनी विधानसभेतच बोलताना  बावनकुळे यांच्या बारामती दौ-याचा उल्लेख करीत त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला. त्याला बावनकुळे यांनी  प्रत्युत्तर दिले. बारामतीतील  माझ्या एका दौ-यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रमाची भाषा बोलत आहे. प्रत्यक्षात कुणाचा कार्यक्रम करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल, असे बावनकुळे यांनी केले. त्याला पवार यांनी उत्तर देताना ” बावनकुळेंचे आव्हान ऐकल्यापासून मला रात्रभर मला झोप येई ना ना, असा उपहासात्मक टोला लगावला. त्याला पुन्हा बावनकुळे यांनी उत्तर दिले. शरद पवारांमळे  अजित पवार मोठे झाले त्यांचे अस्तित्व काय? कर्तृत्व काय? त्यांनी केवळ सत्तेपासून पैसा व पैशांपासून सत्ता एवढेच काय ते केलेय. अजित पवारांनी दिलेले आव्हान आम्हाला मान्य आहे, असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा- “कर्नाटकामध्ये भाजपा स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार”, अमित शहांची मोठी घोषणा; म्हणाले, “काही लोकं जाणीवपूर्वक…”

बावनकुळे- पवार वादात शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली. बारामतीवर  बावनकुळे यांचे लक्ष आहे. ‘मिशन महाराष्ट्र’ अंतर्गत ते तेथे गेले. पण बारामतीत येऊन आव्हान देणे पवार यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना  बावनकुळेंना राग आलेला दिसतो, असे फडणवीस म्हणाले. प्रत्यक्षात  कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे काळ ठरवणार आहे.