मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज भरणाऱ्या राज्यातील विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव नाकारले गेले? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ईसीआय) केली, तसेच त्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३० ऑक्टोबर शेवटचा दिवस होता. त्यामुळे या दिवशी सकाळी ११ नंतर दाखल झालेले किती उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले, अशीही विचारणा न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्य़ायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे केली. तसेच अशा इच्छुक उमेदवारांची यादी सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, भिवंडी मतदारसंघातही याच कारणास्तव अर्ज नाकारण्यात आल्याची बाब आणखी एका उमेदवाराने याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचीही न्यायालयाने दखल घेतली व दोन्ही प्रकरणांवर मंगळवारी सुनावणी ठेवली.

हेही वाचा >>>माघारनाट्य मविआच्या पथ्यावर? मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा मराठवाड्यासह राज्यात फायदा होण्याची शक्यता

अर्ज सकाळी ११ नंतर घेणार नसल्याचे कसे ठरवले?

निवडणूक आयुक्तांनी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज छाननी सुरू करण्याचे आदेश दिले होते आणि त्यामुळे त्या मुदतीबाहेरील अर्ज नाकारल्याचा दावा निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आला. परंतु सकाळी ११ हीच उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ कशी? अंतिम अर्ज स्वीकरण्याची वेळ सकाळी १२ अथवा दुपारी १ वाजल्याची असती तर समजू शकलो असतो. मात्र कार्यालयीन कामकाज सुरू होण्याची वेळ अंतिम वेळ कशी असू शकत? दिवसभराचे संपूर्ण कामकाजाचे तास का उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ असू शकत नाहीत? असे प्रश्न न्यायालयाने विचारले.