मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मंगळवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. आवश्यक असलेल्या नियमांची पूर्तता करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने नोंदवले. त्यानंतर पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारे अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांची याचिका फेटाळून लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचे नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपल्या आईच्या नावाचा उल्लेखच केला नाही. हे निवडणूक नियमावलीचे उल्लंघन असून पाटील यांची खासदारकी यामुळे अवैध ठरत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.