मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जोरदार तयारी सुरू केली असून महायुतीच्या संयुक्त मेळाव्यास २० ऑगस्टला कोल्हापूरपासून प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून संवाद यात्रांनाही सुरुवात होईल. राज्यात महायुतीचे ९ मोठे मेळावे आयोजित करण्यात येणार असून निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.

महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जनतेपर्यंत पोचण्यासाठी शासकीय पातळीवर आणि पक्षपातळीवर मेळाव्यांचे नियोजन केले आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज यासह अनेक योजना व महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. ते जनतेपर्यंत पोचविण्यासाठी शासकीय पातळीवरही मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून मंगळवारी जळगाव येथे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ मेळावा झाला. या धर्तीवर राज्यात प्रत्येक महसुली विभागात एकूण किमान पाच मोठे संयुक्त मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पक्षपातळीवरूनही महायुतीचे संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार असून त्यास शिंदे, फडणवीस व पवार उपस्थित राहतील. नागपूर, अमरावती, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, लातूर, महाड, ठाणे व मुंबईत हे मेळावे होणार आहेत. ‘एकजूट महाराष्ट्राच्या अभिमानाची, विकासाची, कल्याणाची’ अशी मेळाव्याची संकल्पना (टॅगलाईन) ठरविण्यात आली आहे. कोल्हापूर येथे पहिला संयुक्त मेळावा होणार असून महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शिंदे, फडणवीस व पवार हे मेळाव्यास येतील.असे महायुतीचे मुख्य समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. या मेळाव्यांसाठी केंद्रीय नेते, मंत्री, महायुतीचे खासदार, आमदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहतील.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?

हेही वाचा >>>उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या १० जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष कशी करतोय तयारी?

दिवसभरात तीन मेळावे

२० ऑगस्टपासून राज्यातील प्रत्येक महसुली विभागात संवाद यात्रांचे आयोजन करण्यात आले असून एका दिवसात दोन-तीन विधानसभा मतदारसंघात मेळावे घेण्यात येणार आहेत. सर्व २८८ मतदारसंघात संवाद यात्रांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत शासनाचे निर्णय व कामगिरी पोचवून त्यांच्याशी संवाद साधला जाणार असल्याचे लाड यांनी नमूद केले.