सांंगली : सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात तब्बल दोन डझन इच्छुकांनी आतापासूनच मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. स्वपक्षियासह महायुतीतील मित्रपक्षांकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याने विधानसभा निवडणुकीत मंत्री खाडे यांना आव्हान कोणाचे याचे उत्तर मतदारच शोधतील असे दिसते. लोकसभा निवडणुकीत भाजपचे मतदान घटल्याने विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी एकास एक लढत झाली तरच मंत्री अडचणीत येऊ शकतात. मात्र, विरोधकांची मोट बांधणार कोण?

लोकसभा निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला मिळालेल्या २५ हजाराच्या मताधिक्याने मैदानात उतरणार्‍या इच्छुकांची गर्दी वाढत असून बहुसंख्य प्रमुख राजकीय पक्षाचे इच्छुक मतदारसंघावर दावा करत आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या आताच दोन डझनावर पोहोचली आहे. यातील काहींनी अद्याप ग्रामपंचायतीची निवडणूक लढवलेली नाही अशांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. यामागे लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली पिछेहाट कारणीभूत आहे.

man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Prithviraj Chavans statement regarding the election results satara
निवडणुकीच्या निकालाबाबत सरकारची दडपशाही ब्रिटिशांपेक्षाही वाईट: पृथ्वीराज चव्हाण
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

हेही वाचा – राहुल गांधींच्या मणिपूर दौर्‍यामागचा नेमका उद्देश काय? या दौर्‍यामुळे भाजपावर दबाव वाढणार का?

मिरजेचे प्रतिनिधित्व कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री खाडे हे करीत आहेत. २००९ मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या मिरज मतदारसंघावर आपला कब्जा केला आहे. गेल्या तीन निवडणुकींमध्ये त्यांनी एकतर्फी निवडणूक जिंकली असली तरी यावेळी मात्र, लोकसभा निवडणुकीतील मतदानावरून कसोटी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचेच लक्ष्य लागून राहिले आहे. कारण महायुतीतील शिवसेना, जनसुराज्य शक्ती यांनी मिरज मतदारसंघावर दावाही केला आहे. यामुळे पालकमंत्री खाडे यांना अगोदर महायुतीअंतर्गत उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार असे दिसते. याचबरोबर गेल्या दोन वर्षांमध्ये वारसदार म्हणून त्यांनी आपले पुत्र सुशांत खाडे यांना जनतेसमोर आणले आहे. मंत्री असल्याने मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते असा आरोप होऊ नये यासाठी त्यांनी पत्नी सुमनताई खाडे आणि पुत्र सुशांत यांना मतदारसंघात संपर्क ठेवण्यास सांगितले आहे.

दुसर्‍या बाजूला महायुतीतूनच जनुसराज्य शक्तीने मतदारसंघावर प्रबळ दावा केला आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर जनसुराज्यने आपल्या वाट्याला मिळणारा विकास कामाचा निधी मिरज मतदारसंघासाठी खेचून आणला. पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी मिरजेतील मेळाव्यात मिरजेवर केलेला दावा आणि यानंतर प्रदेशाध्यक्ष समित कदम व भाजपचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार कोरे यांची उपस्थिती बरेच काही सांगणारी ठरली. प्रा. वनखंडे हे एकेकाळचे मंत्री खाडे यांचे निकटचे सहकारी मात्र, आता दोघामध्ये वितुष्ट आल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे जर भाजपची उमेदवारी मिळाली नाही, तर मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्यच्या कोट्यातून उमेदवारी मिळवायचीच असा चंग या गटाने केला असल्याने पालकमंत्री खाडे यांनी उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट आहे. यात ते कितपत यशस्वी होतात हे पाहणेही मजेशीर ठरणार आहे.

हेही वाचा – फडणवीस यांच्या कानपिचक्यानंतर तरी शिंदे, अजित पवार गटातील कुरघोडी थांबणार ?

महायुतीतील शिवसेना शिंदे गटानेही या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली असून या पक्षाच्या युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी आता गावभेटीबरोबरच संपर्क अभियान सुरू केले आहे. रिपाईनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. यामुळे युतीतच उमेदवारीसाठी मोठा संघर्ष दिसत असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटानेही जिल्ह्यातील सर्व जागा लढविण्याची तयारी सुरू केल्याचे शहर जिल्हा प्रमुख प्रा. पद्माकर जगदाळे यांनी सांगितले. याउलट महाविकास आघाडीत काँग्रेसचा जागेवर दावा असताना उबाठा शिवसेनेनेही तयारी केली आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी पोस्टरबाजीच्या माध्यमातून आणि हस्तपत्रिकेच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालविला आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादीचे बाळासाहेब व्हनमोरे यांनी खाडे यांच्या विरोधात लढत दिली आहे. यामुळे त्यांनाही यावेळी आमदारकीचे वेध लागले आहेत. मात्र, आघाडीची उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळते, यावर पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत. आघाडीत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेनेने उमेदवारीवर दावा केला आहे. महेशकुमार कांबळे, महेंद्र गाडे, महादेव दबडे, इंद्रजित घाटे, सी. आर. सांगलीकर, अशोक कांबळे आदींनी उमेदवारीवर दावा केला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही नावांची भर यामध्ये पडेल. यामुळे एका जागेसाठी किमान दोन डझन उमेदवार शर्यतीत असतील अशी स्थिती आहे.

Story img Loader