नागपूर : भाजपचा गड असलेल्या पूर्व नागपुरात २०१९मध्ये ५४.५ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात पाच टक्के वाढ झाली. सरासरी ५९.४२ टक्के मतदान झाले. या वाढीव मतदानाच्या बळावर बंडखोरच निकाल ठरवणार, अशी या मतदारसंघात चर्चा आहे.

पूर्व नागपुरात विधानसभा निवडणुकीत ४ लाख १८ हजार ९८१ मतदार होते. त्यापैकी १ लाख २७ हजार पुरुष तर १ लाख २१ हजार ९२९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. पुनापूर, हिवरीनगर, पारडी, चैतन्येश्वर नगर, सूर्यनगर, शांतीनगर, भरतवाडा, मिनीमाता नगर, गुलमोहोर नगर, सूर्यनगर आणि डिप्टी सिग्नल या भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. त्यात महिला मतदारांचे प्रमाण जास्त आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम या मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर दिसून आला. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वर्धमाननगर, क्वेटा कॉलनी, सतनामनगर, देशपांडे लेआऊट, मस्कासाथ या भागात त्या तुलनेत मतदान कमी झाले. काँग्रेसचे बंडखोर पुरुषोत्तम हजारे आणि अजित पवार गटाच्या आभा पांडे हे किती मते घेतात, यावर निकालाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

central Nagpur, Nagpur, votes Nagpur,
मध्य नागपूरमध्ये ३४ हजार वाढीव मतांवरच विजयाचे गणित
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
Shivsena Thackeray vs SHinde in 49 constituencies
‘हे’ ५१ मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची, ठाकरे – शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा – मध्य नागपूरमध्ये ३४ हजार वाढीव मतांवरच विजयाचे गणित

हेही वाचा – पश्चिम नागपूरध्ये लाडक्या बहिणींचे मतदान अधिक, कौल कुणाला?

मतदान कधी, किती?

२०१९ – ५४,५ टक्के

२०२४ – ५९.४२ टक्के

२०१९ मध्ये मिळालेली मते

कृष्णा खोपडे (भाजप) १ लाख ३ हजार ९९२

पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस) ७९ हजार ९७५