नवी मुंबई : निवडणुका येतात व जातात राजकारणी फक्त एकमेकांची उणीधुनी काढतात, परंतु सामान्य नागरिकांच्या हाताला काही लागत नाही.मुंबई शहराचे नियोजनइंग्रजांनी केले म्हणून आज मुंबईत शिवाजी पार्क, ओव्हलसारखी मैदाने आहेत. त्यांनी वैद्याकीय सुविधांसाठी के ईएम व इतर रु ग्णालये तयार के लीत. नवी मुंबई शहराला नवी मुंबई म्हणतो पण या शहराच्या १५ लाखांहून अधिक लोक संख्येला फ क्त १ नाट्यगृह आहे. त्यामुळे टाऊ न प्लॅनिंग म्हणजेच शहर नियोजन हा भाग कुठेच उरला नाही. त्यामुळे शहरे बकाल झाली आहेत, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सानपाडा येथील प्रचार सभेत सांगितले.
मुंबई शहराच्या विस्तारासाठी नवी मुंबई शहर निर्माण क रण्याचे काम वसंतराव नाईकांनी के ले, पण महाराष्ट्रभर शहरे बकाल होऊ लागली आहेत. त्यामुळे तुमच्या भावी पिढीला तुम्ही काय देणार आहात याचा विचार मतदारांनी के ला पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
हेही वाचा >>>ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?
नवी मुंबई शहरातील बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी गजानन काळे व ऐरोली मतदारसंघासाठी नीलेश बाणखिले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी आपले विचार मांडले.
नवी मुंबई डी. वाय. पाटील मैदान आहे हे डॉ. डी. वाय. पाटील यांचे, मग सरकार का अशी मैदाने निर्माण क रू शक त नाही. कारण निवडून देणाऱ्यांना शहर नियोजन म्हणजे काय हे क ळतच नाही. त्यामुळे १९४५ चे शिवाजी पार्क आता होणे नाही. त्यामुळे निवडणुकीला उभे राहणारे हे देतो ते देतो सांगतात. पण मूलभूत गरजा कोण देणार, हा प्रश्न आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.