नांदेड : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नांदेडमध्ये संयुक्त जाहीर सभेचा प्रस्ताव दिला होता. पण तो बारगळला असून काँग्रेसने लक्ष केंद्रित केलेल्या हिंगोली मतदारसंघात स्वतंत्र जाहीर सभेची आखणी करत ठाकरे गटाने काँग्रेसवर कुरघोडी केल्याचे चित्र समोर आले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मतदारसंघांचे महाविकास आघाडीत जागावाटप निश्चित झालेले नाही. पण काँग्रेसने नांदेड आणि लातूर या दोन जागांसोबतच हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा करण्याची तयारी चालवली असतानाच शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या हिंगोलीतील २७ ऑगस्टच्या सभेची गुरुवारी घोषणा केल्यानंतर हिंगोलीच्या जागेवरून वरील दोन पक्षांमध्ये ताणाताणी होणार, हे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे गेल्या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नांदेड-हिंगोली व परभणी दौर्‍यावर येणार होते, पण त्यांच्या या दौर्‍याच्या काही दिवसआधी चव्हाण व ठाकरे यांची मुंबईत भेट झाली होती. या भेटीत चव्हाण यांनी ठाकरे यांच्याशी नांदेडमधील संयुक्त सभेसंबंधी चर्चा केली होती. या चर्चेनंतर ठाकरे यांनी आपला नियोजित दौरा लांबणीवर टाकला, पण नंतर चर्चेची पुढची फेरी होण्यापूर्वीच ठाकरे गटाने २७ ऑगस्टच्या हिंगोलीच्या सभेची घोषणा मुंबईहून केली आणि नांदेडचा संयुक्त सभेचा विषय बाजूला ठेवला.

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

हेही वाचा – हरियाणातील जेजेपी पक्ष राजस्थानची विधानसभा निवडणूक लढवणार, काँग्रेसची अडचण वाढणार?

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत हिंगोलीची जागा शिवसेनेने विक्रमी मताधिक्याने जिंकली होती. गेल्यावर्षी या पक्षात मोठी फूट पडल्यानंतर पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांनी आधी उद्धव यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली, पण नंतर ते एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. १९९० नंतर शिवसेनेने या मतदारसंघात पाचवेळा विजय मिळवला असल्याने आगामी निवडणुकीत तेथे आपला उमेदवार उभा करण्याची ठाकरे गटाची योजना असल्याचे काही पदाधिकार्‍यांकडून सांगितले जात होते. आता त्याच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून सेनेने उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र सभा ठेवली आहे.

शिवसेनेच्या या सभेवर काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, पण अशोक चव्हाण शनिवारी नांदेडमध्ये येत आहेत. त्यानंतर काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगोलीची जागा लढविण्यासंदर्भात तसेच तेथे सक्षम उमेदवार देण्यासंदर्भात काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. पण ही जागा आम्हीच लढविणार, असे सेनेच्या संपर्कप्रमुखांनी दीड महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते. आता या पक्षाचे पाऊल त्या दिशेने पडले आहे.

हेही वाचा – ‘इंडिया’च्या बैठकीच्या वेळीच सत्ताधारी विरोधकांना कोणता दणका देणार?

ठाकरे यांच्या सभेची अधिकृत घोषणा पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली. त्यात दिनांक, वेळ आणि स्थळाचाही उल्लेख असून सभेच्या पूर्वतयारीसाठी पक्षाचे प्रमुख नेते रविवारी हिंगोली व नांदेडच्या दौर्‍यावर येत असून दोन्ही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी दिली.

Story img Loader