कविता नागापुरे

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात आलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे जिल्ह्यालाही बसले आहेत. विशेषतः जिल्ह्यातील शिंदे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचे बोलले जात आहे.सरकारला समर्थन असल्याने मंत्रिपद, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद किंवा महामंडळ आपल्यालाच मिळावे, अशी त्यांची इच्छा होती, ती तूर्तास धुळीस मिळाली आहे. दुसरीकडे, तुमसर-मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता बळावली आहे.

controversy over distribution of burkha by shinde group
शिंदे गटाकडून बुरखावाटप केल्याने वाद
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Dhule Eknath shinde shivsena marathi news
धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
Absence of Shiv Sena Thackeray faction at Vishwajit Kadam rally in Sangli
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गटाची पाठ
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
Assembly Election 2024 NCP Congress Ajit Pawar Group BJP Uddhav Thackeray Group
अजित पवार गटामुळे भाजपला गळती?

भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील वर्चस्व वाढले. सत्तेत असल्याने जिल्ह्यात विकासकामांसाठी निधी आणणे भोंडेकरांना सहज शक्य झाले. शिवाय, मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी जुने संबंध असल्यामुळे मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा ते बाळगून होते. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारात केवळ अजित पवार समर्थकांनाच मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांची स्वप्ने तूर्तास धुळीस मिळाली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचारप्रमुखच भाजपचे आगामी विधानसभा उमेदवार असतील, असे स्पष्ट केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवणे भोंडेकरांसाठी आव्हानात्मक असणार आहे. एकंदरीत, आ. भोंडेकर यांच्या चिंतेत आता चांगलीच भर पडली आहे.

दुसरीकडे, अजित पवारांचे समर्थक असल्यामुळे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांचे जिल्ह्यातील वर्चस्व वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचा नेता उपमुख्यमंत्री असल्यामुळे आणि पक्षाचे काही नेते मंत्री असल्यामुळे कारेमोरेंना बळ मिळेल, यात तिळमात्र शंका नाही.या राजकीय उलथापालथीमुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांना मात्र धोका नाही. हे लोकसभा क्षेत्र भाजप आपल्याच ताब्यात ठेवेल, यात दुमत नाही. याउलट भाजप उमेदवाराला आता राष्ट्रवादीचीही मते पडतील. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात फायदाच होईल. मात्र, सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा फायदा काँग्रेसलाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडींचा लाभ पदरात पाडून घ्यावयाचा असेल तर काँग्रेसला एकजूट होऊन लढण्याची गरज आहे.राज्यात झालेल्या या राजकीय भूकंपाचे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात, ते लवकरच कळेल. तूर्त जिल्ह्यातील दोन आमदारांची स्थिती ‘कही खुशी, कही गम,’ अशीच आहे.