मुंबई : मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये (मालकी हक्क) रूपांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे गेल्या ६० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या जमिनी मूळ मालकांना परत मिळणार असून याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या प्रकारचा निर्णय विदर्भातील जमिनींसाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनींचा मालकी हक्क मिळाला होता.मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील इनाम व देवस्थानच्या खालसा झालेल्या जमिनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा