मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने तर माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना शिवसेनेच्या शिंदे गटाने उमेदवारी दिल्याने अन्य पक्षांमधून आलेल्या ‘उपऱ्यां’ना राजकीय पक्षांकडून राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची परंपरा राज्यात यंदाही कायम राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्य पक्षांमधून आलेल्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्यांना राज्यसभेची खासदारकी देण्याचे प्रकार राज्यात यापूर्वी घडले आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अशोक चव्हाण यांना भाजपकडून तर मिलिंद देवरा यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राज्यसभेची खासदारकी मिळणार आहे.

हेही वाचा – विधान परिषद निवडणुकीतील पराभवातून हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी

अन्य पक्षांमधून आलेल्या किंवा पक्षाशी काहीही संबंध नसलेल्यांना राज्यसभेची खासदारकी देण्याची परंपरा शिवसेनेने सुरू केली होती. माजी राज्यमंत्री चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या माजी नेत्यांना शिवसेनेने राज्यसभेची खासदारकी दिली. उद्योगपती आणि ‘व्हिडिओकाॅन’चे राजकुमार धूत, बँकिंग क्षेत्रातील एकनाथ ठाकूर, कायदातज्त्र अधिक शिरोडकर, पत्रकार प्रीतीश नंदी, संजय राऊत, भारतकुमार राऊत आणि संजय निरुपम यांना शिवसेनेने राज्यसभेसाठी संधी दिली. चार वर्षांपूर्वी शिवसेनेने काँग्रेसचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी दिली होती. उपऱ्यांना राज्यसभा देण्याच्या शिवसेनेच्या निर्णयावर तेव्हा बरीच टीकाही झाली होती.

हेही वाचा – काँग्रेसच्या चेहऱ्यावरील जातवर्चस्वाचा ओरखडा पुसण्याचा प्रयत्न

शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून आलेल्या नारायण राणे यांना सहा वर्षांपूर्वी भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली होती. यंदा काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेसाठी संधी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच पुनरावृत्ती करीत बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीने उद्योगपती राहुल बजाज आणि माजी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या राज्यसभेची खासदारकी पुरस्कृत केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत असतानाही बजाज आणि अलेक्झांडर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tradition of giving rajya sabha candidature to leaders who have switched parties continues print politics news ssb
Show comments