छत्रपती संभाजीनगर : भाजपतील वरिष्ठ नेत्यांशी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे मधुर संबंध आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवाऱ्या देताना भाजपशी संगनमत केले. या काळातील त्यांचे दूरध्वनी क्रमांकाच्या नाेंदी त्यांनी जाहीर कराव्यात. म्हणजे खरे- खोटे आपोआप बाहेर येईल. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात कोणी तरी कमकुवत उमेदवार देऊन त्यांना भाजप नेत्यांना मदत करायची आहे, म्हणून त्यांनी मला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. उमेदवारींच्या अंनुषंगाने एमआयएमचे सर्वेसर्वा ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांना पाच मिनिटे वेळ मागितला होता. पण तोही मिळाला नाही. त्यामुळे आता एमआयएममधील उमेदवारीची दारे बंद झाली असल्याचे वाटत आहे. त्यामुळे निवडणुकीला उभे रहायचे की नाही, त्यासाठी कोणता पक्ष योग्य राहील, याची चर्चा कार्यकर्त्यांशी करुन निर्णय घेऊ, असे डॉ. गफ्फार कादरी यांनी सांगितले.

सोमवारी रात्री त्यांनी मुस्लिम समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी २६ सप्टेंबर रोजी एमआयएमचे ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांना लिहिलेले एक पत्र कार्यकर्त्या वाचून दाखवले. या बैठकीच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, ‘ अलिकडच्या काळात असे जाणवत होते की, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना मला औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी द्यायची नाही. त्यांनाच स्वत:च या मतदारसंघातून निवडणूक लढावायची आहे, असे वातावरण त्यांनी निर्माण केले. वास्तविक त्यांना या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात एक कमकुवत उमेदवार द्यायचा आहे. त्यामुळे त्यांना कोणाला मदत करायची आहे, ते लगेच समजेल. त्यामुळे आपली भूमिका समजावून सांगावी आणि कार्यकर्ते जो सल्ला देतील, तो मान्य करुन पुढील राजकी दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावली होती.’

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
maharashtra vidhan sabha election 2024 tought contest in five assembly constituencies in akola district
अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

हेही वाचा >>>नाशिकमधील जागावाटप तिढ्यावर शरद पवार यांचा तोडगा मान्य होणार का ?

औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे आहे. या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्यांना ९३९५६ मतदान मिळाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ८० हजार ३६ मतदार मिळाले होते. याच मतदारसंघाम समाजवादी पक्षाच्या कलीम कुरेशी यांना पाच हजार ५५५ मते मिळाली होती. याच काळात प्रदेशाध्यक्ष जलील यांनी औरंगाबाद पूर्वची कार्यकारिणी रद्द केली होती. वंचित बहुजन आघाडीबरोबर काडीमोेड घेतल्याचा फटका एमआयएमला बसल्याचा आरोप डॉ. गफ्फार कादरी यांनी केला आहे. त्यांची आमच्या बरोबर बसून त्यांचे कॉल रेकॉर्ड दाखवले तरी त्याचे भाजप नेत्यांशी असल्याचे संबंध स्पष्ट होऊ शकतील, असे डॉ. कादरी म्हणाले.

कादरी वंचितच्या वाटेवर

काही दिवसापूर्वी डॉ. गफ्फार कादरी व ॲड्. प्रकाश आंबेडकर यांची लोकसभा निवडणुकीनंतर भेट झाली होती. त्यामुळे ते उमेदवारीसाठी वंचितचा पर्याय निवडू शकतात, अशी चर्चा आहे. दरम्यान काही कॉग्रेस नेत्यांनीही आपल्याशी संपर्क साधला होता. मात्र, कोणत्या पक्षात जायचे हे कार्यकर्ते सांगतील. ते सांगतील तसा निर्णय घेऊ, असे डॉ. कादरी म्हणाले.