प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व करणारे देशाचे माजी गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी आजच्या परिस्थितीत श्रीमंतांना व गरिबांना काँग्रेस आपल्यापासून दुरावत चालल्याची भावना बळावत चालल्यामुळेच काँग्रेसची आजची स्थिती निर्माण झाली असल्याची भावना ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. ९० वर्षीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी अनेक प्रश्नांना अतिशय मनमोकळी उत्तरे दिली.

Dahanu Assembly Seat Vinod Nikole
स्वतःचं घर, गाडी नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला राज्यात जिवंत ठेवणारे एकमेव आमदार आहेत तरी कोण?
maharashtra vidhan sabha election 2024 a three way challenge for the congress in west Nagpur print politics news
पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसपुढे तिहेरी लढतीचे आव्हान
maharashtra vidhan sabha election 2024 vote split decisive in washim district tirangi ladhat
वाशीम जिल्ह्यात मतविभाजन निर्णायक; तिरंगी-चौरंगी लढतींमुळे रंगत
Abhijeet Adsul and Navneet Rana
दर्यापुरात महायुतीतील संघर्ष वेगळ्या वळणावर
akola district mahayuti mahavikas aghadi vanchit aghadi
अकोला जिल्ह्यात तिरंगी सामने; महायुती, महाविकास आघाडीसह वंचित लढतीत
Shashikant Khedekar, Manoj Kayande, Rajendra Shingane
सिंदखेडराजाच्या आखाड्यात दोन मित्र समोरासमोर, ‘शत्रू’चेही आव्हान
Friendly contests 27 constituencies, Mahavikas Aghadi, Mahavikas Aghadi latest news,
२७ मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढतींचे ‘मविआ’समोर आव्हान
Pachora Constituency, Kishor Patil,
लक्षवेधी लढत : बहिणीमुळे अवघड वाट, त्यात बंडखोरांचे गतिरोधक
Thane Palghar Mahayuti, Thane, Palghar,
ठाणे, पालघरवर महायुतीची भिस्त

प्रश्न : गेल्या ५५ वर्षांपासून लातूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षापासून ११ निवडणुका आपण लढल्यात. त्या वेळच्या व आताच्या राजकारणात झालेल्या स्थित्यंतराकडे आपण कसे पाहता?
उत्तर : १९७२ च्या दरम्यान लातूर नगरपरिषदेची निवडणूक लढली तेव्हाचा काळ अतिशय वेगळा होता. अतिशय कमी खर्चात ही निवडणूक झाली. प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांचा मोठा संच असायचा, स्वतःची भाजी, भाकरी बांधून ते प्रचाराला फिरत असत. मला केवळ वाहनाच्या पेट्रोल, डिझेलचा खर्च करावा लागत असे. मी लढलेल्या एकूण निवडणुकांचा खर्च एक कोटी इतकाही नसेल. आता निवडणुका या पैशाच्या झालेल्या आहेत. पैसे घाला, पैसे काढा ही भावना बळावत चालली आहे. सर्वच बाबतीत जसे बदल होतात तसे ते राजकारणातही आहेत आणि हे होणारे बदल निश्चितच तसेच त्रासदायक आहेत.

आणखी वाचा-‘४०० पार’साठी वाट्टेल ते! भाजपाकडून एक चतुर्थांश विद्यमान खासदारांना डच्चू, इतरांचाही नंबर लागण्याची शक्यता

प्रश्न : पक्षीय राजकारणात एकमेकांवर टीका करण्यासाठी अनेक चुकीचे आरोप केले जातात याकडे आपण कसे पाहता?
उत्तर : राजकारणात सत्तेवर जो असतो त्याच्या विरोधात विरोधक टीका करतात. टीका करताना सत्ताधाऱ्यांनी आपल्या कारकिर्दीत काहीच केले नाही, असा सरसकट आरोप केला जातो. वास्तविक हा आरोप चुकीचा आहे. पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यंत सर्वच क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. त्याकाळी ३३ कोटी जनतेला पोटभर पुरेल एवढेही धान्य मिळत नव्हते. आज १४० कोटींची लोकसंख्या झाली. एवढ्या लोकांना पुरेल इतके धान्य उत्पादन करून आपण निर्यात करतो हे काहीच न करण्याचे द्योतक आहे का ? शेती, दळणवळण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत प्रत्येकाचेच योगदान आहे. सिंचनाच्या बाबतीत, विजेच्या बाबतीत सरकारने अतिशय चांगले काम यापूर्वी केले आहे. सौरऊर्जेसाठी आपण पुढाकार घ्यायला हवा, अशी भूमिका स्वर्गीय इंदिरा गांधींची होती. त्याकाळी फार जमले नाही. मात्र, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील १४० देशांना एकत्र बोलावून सौर ऊर्जेच्या बाबतीत आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, आत्मनिर्भर बनले पाहिजे ही भूमिका मांडली व अतिशय वेगाने सौर ऊर्जेच्या बाबतीत काम होते आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे . पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६०० संस्थाने खालसा केली. जमीनदारांच्या जमिनीची कमाल धारणा निश्चित करत अधिक जमीन गरिबांना वाटून टाकली. त्यामुळे गरिबांना हे सरकार आपले आहे, अशी भावना निर्माण झाली. कालांतराने खासगीकरण झाल्यामुळे उद्योगाचे खासगीकरण होत गेले. श्रीमंतानाही सरकार आपल्या विरोधात तर गरिबांनाही आपल्याकडे सरकारचे लक्ष नाही, अशी भावना वाढत गेली. काँग्रेस पक्षाचे आपल्याकडे लक्ष नाही, ही भावना दोन्ही वर्गात बळावत चालली आहे.असे असले तरी काळ सतत बदलत असतो. राम, कृष्ण यांचाही काळ बदलला, हेही लक्षात घेतले पाहिजे.

आणखी वाचा-पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा

प्रश्न : आपला संसदेचा प्रदीर्घ अनुभव आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्या बाबतीत भूमिका कशा असायच्या, आपण काय अनुभवले?
उत्तर : सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांचे शत्रू नाहीत. त्यांच्या वैचारिक भूमिका वेगळ्या आहेत, ही भावना आपल्या देशात अधिक दृढ झाली होती. सोवियत युनियनने झेकोस्लाव्हाकियावर हल्ला केल्यानंतर तेव्हा संसदेत अटलबिहारी वाजपेयी यांनी तीन तास सरकारवर प्रचंड टीका केली होती. पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते ऐकले व त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अटलजींचे कौतुकच केले .उलट हा भावी काळातला पंतप्रधान आहे, अशी ओळख विदेशातील प्रमुखांच्या साक्षीने पंडित नेहरूंनी अटलजींची करून दिली होती. विचाराचा हा व्यापकपणा आपल्याकडे फार जपलेला होता. अटलजीने मला त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे याच पद्धतीची वागणूक सतत दिली. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे या भूमिकेतून ते माझ्याशी कधीच वागले नाहीत, हेही आवर्जून सांगितले गेले पाहिजे. विचाराची ही व्यापकता जपण्याची आपल्या संसदेची परंपरा आहे व ती पुढेही जपली गेली पाहिजे.

प्रश्न : जातीयता, धर्मांधता वेगाने वाढते आहे? याकडे आपण कसे पाहता?
उत्तर : जो अधिक शिकला तो अधिक जातियवादी व धर्मांध बनतो आहे, ही चिंतेची बाब आहे. भ्रष्टाचाराला व्यवहारपणाच्या कोंदणात बसवण्याचा प्रयत्न चिंताजनक असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.