यवतमाळ : भाजप केंद्रीय कार्यालयाने आज रविवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत जिल्ह्यातील आर्णी व उमरखेड मतदारसंघातील उमेदवार घोषित केले नाही. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात उमेदवार बदलणार असल्याची चर्चा खरी ठरते की काय, अशी चर्चा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ भाजपच्या वाट्याला तर प्रत्येकी एक अनुक्रमे शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटणार आहे. भाजपने पाचपैकी तीन मतदारसंघात आज उमेदवार घोषित केले. या तिन्ही जागेवर विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. यात यवतमाळ विधानसभा मतदारसंघात मदन येरावार, राळेगावमध्ये प्रा. डॉ. अशोक उईक तर वणी विधानसभा मतदारसंघातून संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आर्णी आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मात्र भाजपने जाहीर केले नाही. त्यामुळे या मतदारसंघात विविध चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा-भाजपच्या पहिल्या यादीत गडचिरोलीचे नाव नसल्याने विद्यमान आमदाराच्या गोटात अस्वस्थता?
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. संदीप धुर्वे आमदार आहेत. त्यांच्या कारकीर्दीबद्दल पक्षश्रेष्ठींकडे नकारात्मक अहवाल गेला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल १९ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे या मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या विचारात असून, २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटवर विजयी झालेले माजी आमदार राजू तोडसाम यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देवून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय गोटात आहे. भाजपने २०१९ मध्ये राजू तोडसाम यांना डावलून संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राजू तोडसाम अपक्ष लढले व त्यांनी २६ हजार ९४९ मते घेतली. संदीप धुर्वे केवळ तीन हजार १५३ मतांनी विजयी झाले होते. निवडून आल्यांनतर त्यांचा मतदारसंघात संपर्क नसल्याने जनतेमध्येही त्यांच्याबद्दल रोष आहे. त्यामुळे त्यांना यावेळी डच्चू मिळेल, अशी चर्चा आहे.
आणखी वाचा-अमरावती जिल्ह्यात महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे नामदेव ससाणे हे आमदार आहेत. त्यांची कारकीर्द विशेष लक्षात राहण्यासारखी नाही. तसेच भाजपने या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत उमेदवार बदलला आहे. यावेळी मात्र या मतदारसंघावर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रिपाईं आठवले गटाने दावा सांगितला आहे. रिपाईंचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मागितलेल्या जागांमध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे ही जागा भाजप यावेळी रिपाईं आठवले गटाला देईल, अशी चर्चा आहे. येथून मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू महेंद्र मानकर यांना उमेदवारी मिळेल, असे सांगण्यात येते. खुद्द रामदास आठवले यांनीही हा मतदारसंघ रिपाईला सुटल्यास महेंद्र मानकर हे उमेदवार असतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत उमरखेडचा समावेश नाही, असे सांगितले जाते. भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांचा उमरखेड हा गृह तालुका आहे. हा मतदारसंघ रिपाई गटाला सोडण्यास भाजपचा विरोध आहे. त्यामुळे या जागेबाबत काय निर्णय होणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांसह जनतेचेही लक्ष लागले आहे.