इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे प्रदेशाध्यक्ष पनाक्कड सय्यद सादिक अली शिहाब थांगल यांनी रविवारी (४ फेब्रुवारी) अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर आणि प्रस्तावित मशिदीच्या उभारणीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे केरळच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. आययूएमएलचे प्रदेशाध्यक्ष थंगल यांच्या विधानाशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात त्यांनी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला विरोध करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. नवीन मंदिर आणि प्रस्तावित मशीद या दोन्हीमुळे देशातील धर्मनिरपेक्षता मजबूत होणार आहे, असंही पनाक्कड सय्यद सादिक अली शिहाब थंगल सांगतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर IUML हा केरळमधील विरोधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) चा एक प्रमुख सहयोगी पक्ष आहे आणि मुस्लिम समुदायामध्ये त्यांची मोठी उपस्थिती आहे. अयोध्येतील नव्याने तयार झालेले पवित्र राम मंदिर आणि जवळील प्रस्तावित मशिदी हे “धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक” असल्याचे इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) केरळचे प्रदेशाध्यक्ष सादिक अली शिहाब थंगल यांनी म्हटले. मंदिराच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज नाही. मुस्लीम समाजाने या मुद्द्यावर न अडकता भविष्याचा विचार केला पाहिजे, असाही सल्ला त्यांनी दिलाय.

केरळच्या प्रभावशाली पनाक्कड कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य थंगल यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दोन दिवसांनी २४ जानेवारी रोजी मलप्पुरम येथे जाहीर सभेत भाषण केले. रविवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या भाषणाचा व्हिडीओ राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे. त्यानंतर यावर आयएनएलकडून टीका करण्यात आली आहे. आययूएमएल नेत्याने आरएसएसची भाषा घेतली असून, त्यांच्याविरोधात पक्षातीलच नेते रस्त्यावर उतरतील, असं आयएनएलचे म्हणणं आहे.

हेही वाचाः राम मंदिर उद्घाटनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मुस्लिम धर्मगुरूंविरोधात फतवा; कोण आहेत इमाम उमर अहमद इलियासी?

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा संदर्भ देत थंगल म्हणाले, “आपल्या देशात मोठा विकास झाला आहे. देशातील बहुसंख्य समाजाची इच्छा असलेले राम मंदिर प्रत्यक्षात साकार करण्यात आले आहे. देश आता मागे जाऊ शकत नाही. देशातील बहुसंख्य समाजाची ती गरज होती. अयोध्येत राम मंदिर झाल्याने त्याचा निषेध करण्याची गरज नाही. समाजात प्रत्येकाला त्यांच्या श्रद्धेनुसार पुढे जाण्याचे स्वातंत्र्य आहे,” असंही थंगल सांगतात. “न्यायालयाच्या निकालानंतर बांधकाम सुरू असलेले राम मंदिर आणि बाबरी मशीद ही धर्मनिरपेक्षतेची उत्तम उदाहरणे आहेत. ती आपण आत्मसात केली पाहिजेत. दोन्ही धर्मनिरपेक्षतेचे उत्तम प्रतीक आहेत. कारसेवकांनी मशीद उद्ध्वस्त केली होती हे खरे असले तरी त्या दिवसात आम्ही त्यांचा निषेध केला होता,” असंही ते म्हणालेत.

हेही वाचाः बिहारमध्ये सत्तापालट, आता महाराष्ट्राकडे लक्ष? भाजपाची नेमकी रणनीती काय? 

“जेव्हा मशीद पाडली गेली, तेव्हा केरळमधील मुस्लिमांनी देशाला एक आदर्श दाखवून दिला. त्यानंतर संपूर्ण देश आणि तेथील राजकीय नेतृत्वाने दक्षिणेकडे म्हणजेच केरळकडे पाहिले. केरळमध्ये शांतता नांदत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक होते. आम्ही कधीही चिथावणी आणि प्रलोभनांना बळी पडत नाही,” असंही त्यांनी सांगितले. १९९२ मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा IUML चे नेतृत्व सादिक अली यांचा मोठा भाऊ पनाक्कड सय्यद मोहम्मदअली शिहाब थांगल यांच्याकडे होते. तेव्हा ज्येष्ठ थंगल यांनी समाजाला आवाहन केले होते, “हिंदू घरावर एकही दगड पडू नये. गरज भासल्यास मुस्लिमांनी हिंदू मंदिरांचे रक्षण करावे.

बाबरी मशीद विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर पनाक्कड कुटुंब आणि IUML यांच्यातील मध्यममार्गामुळे पक्षात फूट पडली होती. त्यामुळे खासदार दिवंगत इब्राहिम सुलेमान सैत यांनी पक्षातून बाहेर पडून इंडियन नॅशनल लीग (INL) ची स्थापना केली. जे नंतर केरळमध्ये CPI(M) च्या नेतृत्वाखालील LDF चे सहयोगी बनले. १९९२ मध्ये त्यांच्या कुटुंबाने स्वीकारलेल्या मध्यम मार्गाचा संदर्भ देत थंगल म्हणाले, “मुस्लिमांच्या राजकीय केंद्राने तेव्हा हुशारीने परिस्थिती हाताळली होती. तत्कालीन नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेला काळाने मान्यता दिली आहे. नेतृत्वाने वेगळी भूमिका घेतली असती तर समाजाला मोठी किंमत मोजावी लागली असती आणि आज इतिहास वेगळा असता. कालही चिथावणी दिली गेली आणि अनेकांनी वाट लावली. पण IUML ने शांतता आणि सौहार्दाची भूमिका घेतल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

थंगल म्हणाले, बाबरी मशिदीबाबत अनेक ऐतिहासिक वास्तव आहेत. “परंतु काही लोकांना असे वाटते की, समाजाला या समस्येत गुंतवले जाऊ शकते आणि त्यांना त्याच्या भोवतीच फिरवले जाऊ शकते. परंतु भविष्य महत्त्वाचे आहे. आपण इतिहास विसरता कामा नये. ते ऐतिहासिक वास्तव आत्मसात करून समाजासाठी आणि अल्पसंख्याकांसाठीही ते कसे फायदेशीर ठरेल, याचा विचार केला पाहिजे. IUML धोरण हे भूतकाळातील अनुभवांच्या पार्श्वभूमीवर भविष्य घडवण्याचे आहे,’’ असेही ते म्हणाले.

या मुद्द्यावर थंगल यांच्या भूमिकेमुळे मुस्लिम समाजातील प्रतिस्पर्ध्यांकडून टीका सुरू झाली आहे. आयएनएलचे राज्य सचिव कासिम इरिक्कूर म्हणाले, “वेळ दूर नाही, जेव्हा आययूएमएल कार्यकर्ते पक्षाध्यक्ष थंगल यांच्या विरोधात रस्त्यावर उतरतील. मंदिरामुळे धर्मनिरपेक्षता मजबूत होईल, असे सांगून थंगल यांनी आरएसएस आणि संघ परिवाराची भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील इतर मशिदींवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला असताना थंगल यांनी समाजाचा विश्वासघात केला आहे. एक प्रबुद्ध केरळ थंगलला योग्य उत्तर देईल, असंही ते म्हणालेत.

आययूएमएलचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे आमदार पी. के. कुनहलीकुट्टी म्हणाले की, थंगल यांचे विधान चांगल्या हेतूने होते. “कोणीही भाजपाच्या नादाला लागू नये आणि राजकीय फायद्यासाठी या मुद्द्याचा वापर करू नये, अशी त्यांची इच्छा होती. ही भूमिका मशिदीच्या मुद्द्यावर पक्षाच्या पूर्वीच्या भूमिकेशी सुसंगत आहे. त्याचा विपर्यास होता कामा नये,” असेही त्यांनी अधोरेखित केले. द्वेषाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न होत असताना थंगल सलोखा आणि शांततेसाठी बोलत आहेत, असंही काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन म्हणालेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no need to protest if it is the desire of many to have a ram temple criticism of iuml kerala chief panakkad syed sadiq ali shihab thangal statement vrd