मयुर ठाकूर

भाईदर : ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला आणि गेल्या काही वर्षात भाजपचा बालेकिल्ला ठरु लागलेल्या मीरा-भाईंदर शहरात पक्षाने केलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या नव्या नियुक्तीनंतर मात्र जोरदार गटातटाचे राजकारण सुरु झाले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जाणारे या भागाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक किशोर शर्मा यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती होताच भाजपमधील अंतर्गत वाद शमण्याऐवजी वाढू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. यापूर्वी माजी आमदार नरेंद्र मेहता आणि रवी व्यास अशा दोन गटात सुरु असलेला अंतर्गत वाद आता विद्यमान आमदार गीता जैन यांच्या नाराजीमुळे गटागटाने वाढू लागला असून ठाणे लोकसभा मतदारसंघात कमळ फुलविण्याचे स्वप्न पहाणाऱ्या भाजप श्रेष्ठींची डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Phulumbri Assembly Constituency Assembly Election 2024 Challenge to BJP in Haribhau Bagde constituency
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल

ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबईतील दोन, ठाण्यातील तीन तर मीरा-भाईंदरमधील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे नवी मुंबईतून दोन तर ठाण्यातून एक असे सर्वाधिक आमदार निवडून येतात. मीरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेच्या सोबत गेल्या असल्या तरी त्या पुर्वाश्रमीच्या भाजपच्या आहेत. राज्यात सव्वा वर्षापुर्वी राजकीय समिकरणे बदलताच जैन या पुन्हा भाजपच्या गोटात पहायला मिळतात. तसेच पक्षाच्या लोकसभा स्तरावरील बैठकीतही त्या उपस्थित रहात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजपकडे चार आमदारांची मोठी ताकद आहे. हा लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी येथील भाजपचे प्रभावक्षेत्र सातत्याने वाढत असल्याने येत्या काळात याठिकाणी भाजपची दावेदारी वाढली आहे. महत्वाचे म्हणजे एकेकाळी शिवसेना, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा मीरा-भाईदरचा पट्टा २०१४ नंतरच्या बदलत्या राजकीय समिकरणानंतर मात्र भाजपचा बालेकिल्ला ठरु लागल्याने येथील चार-सव्वा चार लाखांच्या मतदारसंघाच्या बळावर भाजप ठाण्यावर दावा करु लागला आहे.

हेही वाचा >>>औरंगाबादमध्ये विजयासाठी भाजपला हवा एमआयएमचा उमेदवार, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यातून अपरिहार्यता स्पष्ट

गटातटाच्या राजकारणामुळे वाढती डोकेदुखी

मीरा भाईंदर भाजप पक्षाचे माजी जिल्हा रवी व्यास यांच्यावर मध्यंतरी पक्षश्रेष्ठींनी येथील विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर जुलै महिन्यात किशोर शर्मा यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. किशोर शर्मा हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत शिवाय माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या गटाचे मानले जातात. शर्मा यांची या पदावर नियुक्ती होताच माजी आमदार नरेंद्र मेहता आणि रवी व्यास गटात अनेकदा जाहीर मतभेदांचे दर्शन घडले. शर्मा यांच्या नियुक्तीनंतर माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार गीता जैन यांनी स्वतंत्र्यपणे काम करण्याची भूमिका निवडली आहे. विधानसभा प्रमुख हेच विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार मानले जात असल्याने आमदार गीता जैन आणि रवी व्यास यांच्यातील अंतर देखील वाढू लागले असून सध्या भाजपमध्ये गीता जैन, नरेंद्र मेहता आणि रवी व्यास असे तीन गट कार्यरत झाले आहेत.

हेही वाचा >>>शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या पश्चात घरातच दुहीची बिजे

नेमका वाद कशावरून ?

मीरा भाईंदर शहरात १४५ आणि १४६ असे दोन मतदार संघ आहेत. मीरा भाईंदर आणि ठाण्याच्या काही भाग मिळून बनलेल्या ओवळा-माजीवडा या १४६ क्रमाकाच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक करतात. १४५ मतदार संघ हा पूर्णतः मीरा भाईंदरचा भाग आहे. या मतदारसंघातून भाजप समर्थक अपक्ष आमदार गीता जैन या निवडून आल्या आहेत. गीता जैन यांनी भाजप पक्षाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना पराभूत करून २०१९ निवडणूक जिंकली आहे. जैन या सध्या भाजपसोबत असल्या तरी आगामी निवडणुकांच्या स्पर्धेत रवी व्यास, मेहता आणि स्वत: जैन याही आहेत. एकाच मतदारसंघात भाजपकडून तिघा उमेदवारांची दावेदारी सुरु झाल्याने पक्षांतर्गत बैठकांमध्ये या गटातटाच्या राजकारणाचे पडसाद उमटू लागले असून हा वाद निस्तरायचा कसा असा प्रश्न आता श्रेष्ठींना सतावू लागला आहे.

मीरा भाईंदर भाजप पक्षात कोणतीही गटबाजी राहिलेली नाही. पक्षात प्रत्येक जण आपआपल्या स्तरावर काम करुन पक्षवाढीसाठी काम करत आहे. पक्षाचे काम असल्यास आम्ही सर्व एकत्र येऊन काम करत आहोत. यापुढे देखील एकत्र काम करत राहणार आहोत.- किशोर शर्मा – भाजप जिल्हा अध्यक्ष (मीरा भाईंदर )