संतोष मासोळे

ना मंजुळा गावित, ना जयकुमार रावल, ना अमरीश पटेल… धुळे जिल्ह्यातील या तिघांपैकी एकालाही शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जिल्ह्याचा मंत्रीपदाचा अनुशेष कायम राहिला आहे. रावल आणि पटेल हे भाजपचे आमदार तर, अपक्ष असलेल्या गावित यांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. परंतु, भाजप-शिंदे गटाने मंत्रिमंडळ विस्तारात धुळ्याचा विचारच न केल्याने उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांपैकी फक्त धुळेच सध्या विनामंत्र्यांचा राहिला आहे.

dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

हेही वाचाराजकीय ऐश्वर्य अनुभवणाऱ्या लातूरमध्ये राजकीय पटावर पोरकेपणाची भावना

साक्री मतदारसंघात भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्याने मंजुळा गावित यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर गावित या भाजपला साथ देतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेला समर्थन देत सर्वांचा अंदाज चुकवला होता. याआधीही धुळे महापालिकेत भाजपचे केवळ तीन सदस्य असतांना गावित यांनी महापौरपद मिळविण्याची किमया केली होती. गावित यांचा आजवरचा राजकीय प्रवास समयसूचकता राखून झाला आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यावर उद्धव ठाकरे यांचे शिवबंधन सोडून त्या शिंदे गटात सामील झाल्या. शिंदे यांच्या गटातील यामिनी जाधव आणि मंजुळा गावित या दोघांपैकी गावित यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती.परंतु, पहिल्या विस्तारात तरी महिला आमदाराला स्थान मिळालेले नसल्याने त्यांचे लक्ष आता दुसरा विस्तार कधी होणार, याकडे आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे आणि भाजप-सेना युती सत्तेत असताना पर्यटन मंत्री राहिलेले दोंडाईचा-शिंदखेडा मतदारसंघाचे जयकुमार रावल यांना त्यांच्याकडे अनुभव असल्याने मंत्रिमंडळात निश्चित स्थान मिळू शकेल, अशी अपेक्षा असतांना त्यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. कधीकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या धुळे जिल्ह्यात भाजपने चांगल्यापैकी बस्तान बसविले आहे. धुळे महापालिका, जिल्हा परिषदही त्यांच्या ताब्यात आहे. धुळे ग्रामीण आणि साक्री मतदारसंघ वगळता जिल्ह्यात भाजपचेच वर्चस्व आहे. धुळे शहरात एमआयएमचा आमदार असला तरी ही जागाही ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे. जिल्ह्यातून काँग्रेस मुक्तीचा नारा देत भाजपने एकेक करत स्थानिक स्वराज्य संस्था ते थेट लोकसभा मतदार संघही ताब्यात घेतला आहे. यासाठी गाव पातळीवर जयकुमार रावल यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, नेत्यांनी काँग्रेसला पद्धतशीर कोंडीत पकडले. यामुळेच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. यामुळे फडणवीस गटाकडून रावल यांना संधी मिळेल ही अपेक्षा होती.

होही वाचा- भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयावर नागपुरात गडकरी समर्थकांची सावध भूमिका

काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश घेतलेले शिरपूरचे अमरीश पटेल यांचेही नाव चर्चेत होते. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर अमरीश पटेल म्हणजेच पक्ष असे समीकरण असल्याने पटेल यांना भाजपतर्फे संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, जिल्हावासीयांचा भ्रमनिरासच झाला. उत्तर महाराष्ट्रातील धुळे वगळता इतर तीनही जिल्ह्यांना मंत्रिपद मिळाले आहे. नाशिकमधून शिंदे गटाकडून दादा भुसे, जळगावात शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, भाजपकडून गिरीश महाजन आणि नंदुरबारमधून आशा नसताना भाजपकडून डाॅ. विजयकुमार गावित यांना संधी मिळाली आहे.

जिल्ह्यास मंत्रीपद नसले तरी धुळे महापालिकेवर वर्चस्व मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे जळगावचे गिरीश महाजन, युती सत्तेत असताना धुळ्याचे पालकमंत्रीपद सांभाळलेले दादा भुसे, अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळाल्याचा आनंद शिंदे गट-भाजपला आहे. दुधाची तहान ताकावर, अशा प्रकारचाच हा आनंद म्हणता येईल. शिंदे गटापेक्षा भाजपला धुळ्याने भरपूर राजकीय बळ दिलेले असल्याने मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात तरी न्याय मिळेल, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.