१८ जागांमध्ये छोट्या पक्षांत रस्सीखेच; आघाडीने दिलेली लेखी हमी उघड करण्याचा इशारा

पवारांना सर्वाधिकार पुण्यात आघाडीच्या छोट्या घटक पक्षांची नुकतीच प्रागतिक पक्ष परिषद झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जागा वाटपांवर बोलणी करण्याचे सर्वाधिकार देण्याचा ठराव संमत केला आहे.

three major parties in maha vikas aghadi to leave 18 seats for six small parties
महाविकास आघाडीतील सहा छोट्या घटक पक्षांसाठी १८ जागा

मुंबई : महाविकास आघाडीतील सहा छोट्या घटक पक्षांसाठी १८ जागा सोडण्याचे प्रमुख तीन पक्षांनी धोरण निश्चित केले असून यातील अधिक जागा मिळवण्यासाठी छोट्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. या सहा घटक पक्षांची ३८ विधानसभा जागांची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस या प्रमुख तीन पक्षांनी विधानसभेच्या २८८ पैकी २७० जागा घेण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित १८ जागा पाच घटक पक्षांना सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> सांगलीत गुरूपुष्य मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज; जयंत पाटील, सुधीर गाडगीळ यांचे शक्तिप्रदर्शन

३८ जागांची मागणी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ६, भारतीय कम्युनिस्ट पक्ष ११, समाजवादी पक्ष १२, शेतकरी कामगार पक्ष ६, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष २ आणि प्रोगेसीव्ह रिपाइं १ अशी विधानसभेच्या ३८ जागांची मागणी या सहा घटक पक्षांनी केलेली आहे. या सहा पक्षांचे विधानसभेत चार आमदार आहेत. छोट्या पक्षांचे जागा वाटप अद्याप झालेले नाही. मात्र ‘शेकाप’ने ४ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. समाजवादीने ५ जागा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ‘मविआ’मधील छोटे घटक पक्ष प्रमुख तीन पक्षांना जेरीस आणण्याची शक्यता आहे.लोकसभेला या घटक पक्षांना आघाडीने एकही जागा सोडलेली नव्हती. त्यांना विधानसभेला सन्मानजनक जागा देण्यात येतील, असा शब्द आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी दिला होता. ‘मविआ’तील प्रमुख तीन पक्षांना प्रत्येकी ८५ जागा देण्याच्या सूत्रात बदल होणार आहे. तसेच छोट्या पक्षांमध्ये शेकाप ६, समाजवादी ५, माकप ४, भाकप १ आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष १ असे १८ जागांचे वाटप होणार असल्याचे आघाडीतील सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three major parties in maha vikas aghadi to leave 18 seats for six small parties print politics news zws

First published on: 25-10-2024 at 04:55 IST
Show comments