Thrissur Pooram fireworks BJP’s Central government clash with Pinarayi Vijayan Govt : केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघात यंदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश गोपी विजयी झाले. यासह भाजपाने लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच केरळमध्ये खातं उघडलं. त्रिशूरमध्ये लोकसभेची जागा जिंकत केरळच्या राजकारणात चंचूप्रवेश करणाऱ्या भाजपाने तेव्हा आतषबाजी केली होतीच, यासह केंद्रातील भाजपा सरकारने आता त्रिशूरमध्ये राजकीय आतषबाजी सुरू केली आहे. भाजपाने त्रिशूर पूरम उत्सवात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. या उत्सवाबाबत केंद्र सरकारने काही अटी जारी केल्या आहेत. त्यावरून केंद्र सरकार व राज्यातील पिनराई विजयन सरकार आमनेसामने आलं आहे.

केंद्र सरकारने रविवारी (२० ऑक्टोबर) त्रिशूर पूरम उत्सवातील फटाक्यांच्या आतषबाजीबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र केरळमधील पिनराई विजयन (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी) यांच्या सरकारने त्याचा कडाडून विरोध केला आहे. विजयन सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून आश्वस्त केलं आहे की प्रतिष्ठित त्रिशूर पूरम उत्सव सुरळीत पार पडेल. त्याचबरोबर राज्य सरकारने केंद्राला त्यांच्या अधिसूचनेतील अटी शिथिल करण्याची विनंती केली आहे. विजयन सरकारने मोदींना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती देखील केली आहे.

विजयन सरकारने म्हटलं आहे की केंद्राने लागू केलेल्या अटी येथील फटाक्यांच्या प्रदर्शनावर परिणाम करतील, जे की येथील प्रमुख आकर्षण आहे. राज्याचे महसूल मंत्री व कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते के. राजन यांनी देखील मोदींना पत्र पाठवून याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

हे ही वाचा >> Indresh Kumar : “माफियांप्रमाणे वक्फ बोर्डाचं काम, भ्रष्टाचाराचा अड्डा आणि…”; संघाचे संयोजक इंद्रेश कुमार यांचं वक्तव्य

केंद्र सरकारने जारी केलेले नियम काय आहेत?

केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मॅगझिन फटाके कार्यक्रम स्थळापासून २०० मीटर दूरवर वाजवावेत. परंतु, यामुळे उत्सवाला उपस्थित लोक फटाक्यांचं प्रदर्शन पाहू शकणार नाहीत. आजवर केल्या जाणाऱ्या आयोजनानुसार कार्यक्रम स्थळापासून ४५ मीटर अंतरावर हे प्रदर्शन भरवलं जातं. त्याचबरोबर प्रेक्षक व प्रदर्शनामधील १०० मीटरच्या अंतराची अटही राज्य सरकारने काढून टाकली आहे.

केंद्राने जारी केलेल्या आणखी एका नियमावर केरळ सरकारने आक्षेप घेतला आहे. केंद्राने म्हटलं आहे की असेंब्ली शेड, म्हणजेच जिथे फटाके ठेवले जातात ते प्रदर्शनाच्या ठिकाणापासून किमान १०० मीटर दूर असलं पाहिजे. परंतु, प्रदर्शनाजवळ असेंब्ली शेड रिकामं असणार आहे असं म्हणत विजयन सरकारने केंद्राचा तर्क चुकीचा असल्याचं मत नोंदवलं आहे.

हे ही वाचा >> परंपरागत काँग्रेसच्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा मोठा डाव; बाळापूर नितीन देशमुख, अकोला पूर्व दातकर, तर वाशीममधून डॉ.देवळेंना संधी; भाजपपुढे आव्हान

u

केरळ सरकारचं म्हणणं काय?

के. राजन म्हणाले, “या नियमांमुळे त्रिशूर पूरम उत्सवात फटाक्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन करणं कठीण होईल. हे नियम म्हणजे सण साजरा करण्यासमोरचं मोठं आव्हान आहेत. हे नियम लागू केले तर तेक्किन्काडू मैदानावर (जिथे दरवर्षी या उत्सवाचं व फटाक्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं) फटाके वाजवणंच अवघड होईल”.

हे ही वाचा >> लोकसभेत भाजपचा प्रचार करणाऱ्या जोरगेवारांसाठी मते कशी मागायची ? चंद्रपूर राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेसचा विरोध

लोकसभा निवडणुकीआधी आयोजित केलेला समारंभ सुरळीत पार पडला नव्हता

पूरम हा केरळमधील खूप लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने त्रिशूरमधील नागरिकांसाठी हा मोठा उत्सव आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी पूरम उत्सव सुरळीत पार पडला नव्हता. पोलिसांना गर्दीचं नीट नियोजन करता आलं नव्हतं. तसेच पोलिसांनी घालून दिलेल्या निर्बंधांमुळे मंदिरांतील पूजाऱ्यांना अनेक विधी करता आले नव्हते. काही विधी मध्येच सोडून द्यावे लागले होते.

हे ही वाचा >> शिवसेनेच्या मराठवाड्यातील १२ उमेदवारांमध्ये वादग्रस्त दोन मंत्री व एका आमदाराचा समावेश !

स्थानिक खासदाराने हस्तक्षेप करण्याची लोकांची मागणी

फटाक्यांचं प्रदर्शन संध्याकाळी केलं जातं. मात्र या उत्सवाच्या आधुनिक इतिहासात पहिल्यांदाच २० एप्रिल रोजी दिवसा हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र भाजपाचे त्रिशूल लोकसभेचे उमेदवार सुरेश गोपी पहाटे तीन वाजता मंदिरातील पूजारी व व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटले व सकाळीच प्रदर्शन सुरू झालं. त्यांच्या हस्तक्षेपाचं भाजपा कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेनेही कौतुक केलं होतं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सुरेश गोपी हे त्रिशूरमधून खासदार म्हणून निवडून आले. गोपी हे आता मोदींच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने त्रिशूर पूरम उत्सवाच्या आयोजनावर लादलेल्या निर्बंधांप्रकरणी गोपी यांनी हस्तक्षेप करावा असं येथील स्थानिक जनतेचं मत आहे.