पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पक्षाच्या काही मोठे नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. गुरुवारी टीएमसीच्या अडचणीत अजून भर पडली आहे. पक्षाच्या आणखी एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. बलाढ्य आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सहकारी असणाऱ्या अनुब्रता मोंडल यांना अटक करण्यात आली आहे. अनुब्रता ममोंडल यांना सीबीआयने अटक केली आहे. यासोबतच कोळसा तस्करी प्रकरणी ईडीने पश्चिम बंगालच्या आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नवी दिल्लीत बोलावले आहे.
बुधवारी फिरहाद हकीम, ब्रात्य बसू, मलय घटक आणि इतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. हताश झालेले हकीम अत्यंत आक्रमकतेने त्यांचा मुद्दा मांडत होते. यावेळी आपली भूमिका मांडताना ते म्हणाले की ” सर्वांना पार्थ चॅटर्जी यांच्या रांगेत बसवू नये.“पार्थ यांनी जे केले त्याची आम्हा सर्वांनाच लाज वाटते. पण याचा अर्थ असा नाही की तृणमूलमधील प्रत्येकजण भ्रष्टाचारी आहे.” ते पूढे म्हणाले की “पक्षावर ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत ते सर्व आरोप निराधार आहेत. असे खोटे आरोप फार काळ टिकत नाहीत. हे सर्व आरोप हे राजकीय उद्देशाने प्रेरित आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. ही संधी साधून विरोधकसुद्धा टीएमसी आरोपांच्या फैरी झाडात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ चॅटर्जी यांच्याप्रमाणे टीएमसी अनुब्रत मोंडल यांच्यावर देखील कठोर कारवाई करू शकते. टीएमसीच्या जेष्ठ नेत्यांनी तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत बाचावत्मक पवित्रा घेतला आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून याबबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यातील पहिली भूमिका म्हणजे “पक्षातील सर्व नेते काही चोर नाहीत आणि कोणत्याही गैरव्यवहारात गुंतलेले नाहीत. पण ते चोर नाहीत असे सांगतानाच पार्थ चॅटर्जी हे दोषी असल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे त्यांनी पार्थ यांना पक्षाने फक्त नाकारलेच नाही तर ते गुन्हेगार असल्याचेही त्यांनी जाहीरपणे मान्य केले आहे.
त्यापूर्वी टीएमसीच्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी या दोन प्रमुख नेत्यांनी रोख, दागिने आणि त्यांच्याशी जोडलेल्या कथित इतर संपत्तीच्या पुनर्प्राप्तीनंतर सर्व प्रकाराल चॅटर्जी स्वतःच जबाबदार स्पष्ट केले होते. ममतांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून तसेच पक्षातील त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.