मोदी सरकार देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार करत आहे. या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून सरकारने विधि आयोगाला समान नागरी कायद्यावर लोकांची, सर्व धर्मांच्या संस्था यांची मते जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता विधि आयोगाने लोकांना समान नागरी कायद्याच्या मसुद्याबाबत अभिप्राय देण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाला काही पक्षांकडून कडाडून विरोध केला जात आहे. विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK) पक्षाचे प्रमुख तथा खासदार थोल थिरुमावलावन यांनीदेखील सरकारच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला आहे. ते तामिळनाडूमध्ये दलित नेते म्हणून ओळखले जातात. सर्वच धर्मीयांसाठी हा कायदा लागू करण्याआधी सरकारने हिंदू धर्मातील सर्व जातींना हा कायदा लागू करावा, अशी भूमिका थोल थिरुमावलावन यांनी घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in