आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवगंगा खासदार कार्ती चिदंबरम यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसला तामिळनाडूमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री ईएम सुदर्शना नचियप्पन आणि ज्येष्ठ नेते के.आर रामास्वामी यांच्यासह तामिळनाडू काँग्रेस कमिटीच्या (टीएनसीसी) शिवगंगा युनिटच्या एका भागाने शिवगंगा मतदारसंघातून कार्ती यांना तिकीट देऊ नका, असा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश होता. यावर नचियप्पन यांनी शिक्कामोर्तब केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३ फेब्रुवारी रोजी शिवगंगा युनिटमधील नचियप्पन आणि इतर उपस्थितांच्या बैठकीत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांच्याविरोधातील ठराव मंजूर करण्यात आला. खासदारांच्या जवळच्या नेत्यांना याची अपेक्षा होती असे सांगण्यात आले. कारण नचियप्पन यांनी २०१९ मध्ये कार्ती यांच्या उमेदवारीला विरोध करण्यापूर्वी त्यांच्या प्रचाराला पाठिंबा दिला होता.

मोदींच्या प्रशंसेमुळे पक्षाच्या शिस्तपालन समितीची कारवाई

गेल्या महिन्यात टीएनसीसीने कार्ती यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कार्ती म्हणाले “राहुल गांधींसह काँग्रेसचा कोणताही नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार कौशल्यांशी बरोबरी करू शकत नाही. कार्ती यांच्या या विधानाने पक्षातील नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्ती यांनी तमिळ वृत्तवाहिनी ‘थंथी टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस नेतृत्वावर केलेली टीका आणि मोदींच्या क्षमतेची अनवधानाने केलेल्या प्रशंसेमुळे पक्षाच्या शिस्तपालन समितीने यावर थेट कारवाई केली.

“टीएनसीसी नेते आणि कॅडर यांच्यासह शिवगंगामधील पक्षाच्या लोकांना असे वाटते की, राहुल गांधी आणि काँग्रेस नेतृत्वावर टीका केल्यामुळे कार्ती यांना यावेळी तिकीट मिळू नये. ते जे बोलले ते काँग्रेस स्वीकारू शकत नाही,” असे टीएनसीसीच्या एका नेत्याने सांगितले. ही भावना खासदाराच्या स्पष्टवक्तेपणामुळे पक्षाच्या प्रतिमेवर आणि एकतेवर झालेल्या नकारात्मक परिणामाबद्दल असंतोष दर्शवणारी आहे, असेही त्यांनी संगितले.

काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या एच. राजा विरुद्ध त्यांच्या लक्षणीय विजयानंतरही नचियप्पन यांनी हे पाउल उचलले. कारण त्यांच्या नामांकनावर पुनर्विचार करण्यासाठी नचियप्पन यांच्यावर दबाव निर्माण करण्यात आला होता. त्याचेच हे फलित आहे.

पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी या विरोधाला न जुमानता ही जागा कार्तीसाठी आरक्षित ठेवल्याचे सांगितले. “यापूर्वीही विरोध झाला होता, परंतु काँग्रेसच्या पदानुक्रमात चिदंबरम कुटुंबाच्या कायम प्रभावामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ते रद्द केले. यावेळीही चिदंबरम आपल्या मुलाचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आपल्या ताकदीचा फायदा घेतील अशी अपेक्षा आहे. संभाव्यत: सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांसारख्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा घेऊन, ”असे टीएनसीसीच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.

नचियप्पनच्या शिवगंगा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे अंतर्गत वादही बिकट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ” चिदंबरम यांच्याबद्दल आदर असूनही कार्ती यांच्यावर राहुल गांधी फारसे खूश नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. नचियप्पन आपल्या फायद्यासाठी या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे,” असे एका नेत्याने सांगितले.

हेही वाचा : काँग्रेसवर सडकून टीका, घराणेशाहीचे आरोप, विजयाचा विश्वास; १७ व्या लोकसभेतील पंतप्रधानांच्या शेवटच्या भाषणातील पाच मुख्य मुद्दे

काँग्रेसचा मित्रपक्ष डिएमके ची भूमिका ही या गुंतागुंतीमध्ये भर घालत आहे. कारण डिएमकेनेही कार्ती यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कार्ती आणि नचियप्पन दोघांनीही अद्याप या विषयावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To drop karti chidambaram from sivganga tn congress devided rac
Show comments