दोन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडतंय. ऐन हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहण्यास मिळालं आहे. अशात २१ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी टॉयलेटमधलं पाणी वापरलं जातं आहे असं दिसत होतं. त्यावरून बराच गदारोळ झाला. आता सार्वजनिक विभागाने स्पष्टीकरण देत हा व्हिडिओ आमदार निवासातला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

अमोल मिटकरी यांनी काय म्हटलं होतं?
आझादी का अमृत महोत्सव हा हॅशटॅग वापरून अमोल मिटकरींनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत आमदार निवासतल्या कपबशा धुण्यासाठी टॉयलेटमधल्या पाण्याचा वापर केला गेल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला होता. “हे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटींचं टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था” अशा खोचक ओळीही मिटकरी यांनी लिहिल्या होत्या.मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाने अमोल मिटकरी यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ आमदार निवासातील नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.

Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
shashank ketkar slam on bmc of the issue of cleanliness watch video
Video: “जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला; म्हणाला, “आता खपवून घेणार नाही…”
a girl child shows humanity
संस्काराशिवाय आयुष्य काहीच नाही! चिमुकलीने दाखवली माणुसकी, वृद्धी व्यक्तीला पाजले पाणी, पाहा VIDEO VIRAL
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

आमदार अमोल मिटकरींनी बुधवारी रात्री ट्विट केलेल्या एका २० सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपची जोरदार चर्चा नागपूर विधिमंडळ परिसरात चालू आहे. या व्हिडीओमध्ये आमदार निवासातील उपहारगृहात कपबशा स्वच्छतागृहात धुतल्या जात असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला होता.

हा मुद्दा दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारला जाब विचारला. “अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून नागपूरला सगळे सदस्य येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था विधिमंडळाला करावी लागते. सरकार कुणाचंही असलं, तरी २८८ आमदार, विधानपरिषदेचे सर्व आमदार, स्टाफ यांची व्यवस्थित सोय करणं हे विधिमंडळाचं काम आहे. असं असतानाही इतक्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. टीव्हीला ही व्हिडीओ क्लिप सारखी दाखवत आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

“कशासाठी हा नालायकपणा चाललाय?”
“विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी एक छोटी व्हिडीओ क्लिप तयार केली आणि त्यात स्वच्छतागृहातच आमदारांना दिल्या जाणाऱ्या चहाच्या कपबशा धुवायचं काम चालू असल्याचं दिसतंय. किती नालायकपणा कराल? कुठे हे पाप फेडाल? कशासाठी हा नालायकपणा चाललाय? संबंधित कंत्राटदाराला करोडो रुपये दिले जातात. त्यात कुठेही हयगय केली जात नाही. सरकार जसं सांगतं, त्याप्रमाणे सगळे सदस्य गेटबाहेर उतरतात. सुरक्षेच्या दृष्टीने जे काही पोलीस यंत्रणा सांगेल ते मुख्यमंत्र्यांपासून सगळे सदस्य पाळतात. एवढं सगळं असताना, आधी सगळा स्टाफ इथे येऊन सगळी तपासणी करत असतानाही हे असं घडतंय”, अशा शब्दांत अजित पवारांनी संतप्तपणे भूमिका मांडली होती.

या सगळ्यानंतर स्पष्टीकरण देत सार्वजनिक विभागाने हा व्हिडीओ हा आमदार निवासातला नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता व्हिडीओ नेमका कुठला? त्यावर सरकार काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader