आम आदमी पक्षाबाबत आता भाजपाचे सर्वोच्च नेतृत्व गंभीर होताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्याशी थेट मुकाबला करण्यासाठी भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने आपली बेफिकिरी सोडण्याच्या निर्णय घेतला असल्याचे समजते. आम आदमी पक्षाचे प्रमुख हे भाजपासाठी दखलपात्र नाहीत हे दर्शवण्यासाठी ही रणनिती आखली होती. मात्र आता पक्षाला त्यांची ही भूमीक बदलावी लागत आहे. पंजाबमधील विजयामुळे भाजपा आणि कॉंग्रेस व्यतिरिक्त दोन राज्यांमध्ये सरकार असणारा ‘आप’ हा देशातील एकमेव पक्ष ठरला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याची भूमिका भाजपाच्या नेत्यांकडून मांडण्यात आली. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाकडून आता यावर पुनर्विचार होताना दिसत आहे.
बुंदेलखंड सारख्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “रेवडी संस्कृती (फ्रीबी) च्या माध्यमातून विरोधी पक्षावर केलेला हल्ला हे याचे ताजे उदाहरण आहे. 

दिल्ली आणि पंजाबनंतर, आप हरियाणाकडे लक्ष देते आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्येसुद्धा आप निर्धाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे. कर्नाटक, आसाम आणि मध्य प्रदेश यांसारख्या अधिक दूरच्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांद्वारे प्रवेश करते आहे. १० खासदार असणाऱ्या ‘आप’ची संसदेतील ताकद इतर कोणत्याही पक्षापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे.  राष्ट्रीय पातळीवर वेगाने वाढणार पक्ष म्हणून भाजपाने ‘आप’ची दखल घेतली आहे. काँग्रेसच्या जागा जिंकण्यासाठी’आप’ आपल्या नियमावलीची नक्कल करत आहे हे भाजपाच्या नजेरतून सुटलेले नाही.’आप’ने दाखवलेल्या चपळपणामुळेच भाजपा आता सावध झाली आहे. 

भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या ‘आप’बाबतच्या भूमिकेत सतत बदल होताना दिसून आले आहेत.  ज्यावेळी दिल्ली जिंकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपासमोर फक्त एकमेव आव्हान होते ते म्हणजे ‘आप’चे. पंतप्रधानपदाचे दावेदार असणारे नरेंद्र मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मूमध्ये एका सभेत म्हणाले होते की “पाकिस्तानने तीन ‘एके’ मधून आपली ताकद उभी केली आहे. एक म्हणजे ‘एके-४७’, दुसऱ्या क्रमांकावर ‘ए के अँटनी’ (तत्कालीन संरक्षण मंत्री) आहेत. तिसरी ‘एके -४९’ आहे. ज्याने नुकताच एका नवीन पक्षाला जन्म दिला आहे.” दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांच्या ४९ दिवसांच्या पहिल्या कार्यकाळाचा संदर्भ  मोदींनी तेव्हा दिला होता.

त्यानंतर अशाच आणखी एका थेट हल्ल्यात पण केजरीवाल यांचे नाव न घेता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, मोदी म्हणाले की, “दिल्लीने अयशस्वी शासनाचे मॉडेल पाहिले आहे”. पूर्वी भाजपाची ‘आप’ बाबतची भूमिका ही अनुल्लेखाने मारण्याची होती. भाजपा नेते अनेकवेळा ‘आप’चा उल्लेख करणे टाळत. मात्र आता ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाचा विस्तार होत आहे त्यामुळे भाजापच्या नेतृत्वाला ‘आप’चे अस्तित्व मान्य करावे लागत आहे

Story img Loader