आम आदमी पक्षाबाबत आता भाजपाचे सर्वोच्च नेतृत्व गंभीर होताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्याशी थेट मुकाबला करण्यासाठी भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने आपली बेफिकिरी सोडण्याच्या निर्णय घेतला असल्याचे समजते. आम आदमी पक्षाचे प्रमुख हे भाजपासाठी दखलपात्र नाहीत हे दर्शवण्यासाठी ही रणनिती आखली होती. मात्र आता पक्षाला त्यांची ही भूमीक बदलावी लागत आहे. पंजाबमधील विजयामुळे भाजपा आणि कॉंग्रेस व्यतिरिक्त दोन राज्यांमध्ये सरकार असणारा ‘आप’ हा देशातील एकमेव पक्ष ठरला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याची भूमिका भाजपाच्या नेत्यांकडून मांडण्यात आली. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाकडून आता यावर पुनर्विचार होताना दिसत आहे.
बुंदेलखंड सारख्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “रेवडी संस्कृती (फ्रीबी) च्या माध्यमातून विरोधी पक्षावर केलेला हल्ला हे याचे ताजे उदाहरण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा