संतोष प्रधान
एकीकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून पक्षांतर्गत नेत्यांशी दोन हात करीत असतानाच धारावी या मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आमदार वर्षा गायकवाड यांच्यासाठी कडवे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबई काँग्रेसमधील गटबाजी रोखण्याकरिता भाई जगताप यांना हटवून वर्षा गायकवाड यांची काही महिन्यांपूर्वी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यापासून गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबद्दल मुंबई काँग्रेसमधील नेतेमंडळी नाके मुरडी लागली. गायकवाड यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात नवी दिल्लीत तक्रारी करण्यात आल्या. काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल पदाधिकाऱ्यांना वर्षा गायकवाड यांनी नोटिसा बजाविल्याने पक्षांतर्गत असंतोष वाढला.
आणखी वाचा-उदय सामंत यांचे नारायण राणे यांनाच आव्हान
धारावी हा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला. गायकवाड यांची २००४ मध्ये लोकसभेवर निवड झाल्यापासून धारावीचा गड वर्षा गायकवाड यांनी राखला आहे. पण पक्षाच्या चार माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना मोठा धक्का बसला आहे. कारण वर्षानुवर्षे सहकारी असलेले पक्ष सोडून गेल्याने नवीन फळी उभी करावी लागणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून शहरात लक्ष घालावे लागते. याबरोबरच आता मतदारसंघ सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.
धारावीच्या पुनर्विकासाचे काम अदानी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. पक्षांतर्गत फुटीमागे पुनर्विकासाचे कारण असल्याचे गायकवाड यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.