पालघर जिल्ह्यात नेतेमंडळींचे पक्षांतर

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चितीकडे येऊ लागल्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असणारे जिल्ह्यातील काही नेते मंडळी पक्षांतराच्या उंबरठ्यावर उभी आहेत.

transposition of leaders frome one party to another party in Palghar
पालघर जिल्ह्यात नेतेमंडळींचे पक्षांतर (प्रतिकात्मक छायाचित्र)

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चितीकडे येऊ लागल्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असणारे जिल्ह्यातील काही नेते मंडळी पक्षांतराच्या उंबरठ्यावर उभी आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी माजी आमदार विलास तरे व अमित घोडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र लोकसभेच्या उमेदवारी ने विलास तरे यांना हुलकावणी दिली. त्यानंतर भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी या दोघांनाही विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासित केले होते.

माजी खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी नाकारून पालघरची जागा भाजपाकडे देण्यात आली होती. उमेदवारी नाकारल्यानंतर काही तासात राजेंद्र गावित यांनी शिवसेना (शिंदे) सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राजेंद्र गावित यांना राज्यातील मंत्रीपद तसेच विधानसभा निवडणुकी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांच्यातर्फे सांगण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी डहाणू, नालासोपारा व विरार या तीन जागा भाजपाला सुटण्याची शक्यता असून भाजपाने नालासोपाराची उमेदवारी जाहीर केली आहे.

Maha Vikas Aghadi, Hitendra Thakur, bahujan vikas agahdi
हितेंद्र ठाकूर एकाकी, महाविकास आघाडीची दारे बंद
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Suspicious death of eight-year-old girl in Mokhada
मोखाडा येथे आठ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू
Jijau organization will enter the election arena in Thane and Palghar
ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना
Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
Shaina NC vs Atul Shah
Shaina NC vs Atul Shah: ‘निवडणूक म्हणजे संगीत खुर्ची आहे का?’, शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपाचे ज्येष्ठ नेत्याचे बंड; अपक्ष उमेदवारी दाखल करणार

आणखी वाचा-Maharashtra Assembly Election 2024 : भाजपच्या नेतेमंडळींच्या घरात उमेदवारी; घराणेशाहीत अनेकांना संधी

राजेंद्र गावित यांना विक्रमगड मतदारसंघातून उमेदवारी देण्यास स्थानीय भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने या विधानसभा निवडणुकी पुन्हा शिवसेनेत पक्षांतर करून पालघर अथवा बोईसर विधानसभा च्या जागेसाठी उमेदवारी मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राजेंद्र गावित यांच्या सातत्याने पक्षांतर करण्याची प्रवृत्ती विरोधात शिवसेनेच्या (शिंदे) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या महविजय संवाद यात्रेदरम्यान झालेल्या सभेत जाहीर विरोध केला असला तरीही शिवसेनेचे काही स्थानीय वरिष्ठ पदाधिकारी गावित यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाने राजेंद्र गावित यांना उमेदवारी द्यावयाची असल्यास त्यांना पुन्हा पक्षांतर करणे आवश्यक राहणार आहे .

पालघरच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे अनेक नावे चर्चेला असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस मधून जिल्हा परिषदेत निवडून आलेले काशिनाथ चौधरी यांच्या देखील उमेदवारीबाबत महाविकास आघाडी कडून विचार केला जात आहे. काशिनाथ चौधरी यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना देखील शिवसेनेत पक्षांतर करणे अनिवार्य ठरणार आहे.

आणखी वाचा-मुंबईतून १३ विद्यामान आमदारांना पुन्हा संधी; शिवसेनेने दावा केलेल्या मतदारसंघांत भाजपचे उमेदवार

बोईसर विधानसभा क्षेत्रातून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून उमेदवारी मिळावी या उद्देशाने डॉ. विश्वास वळवी यांनी यापूर्वीच पक्षांतर केले असून शिवसेना (शिंदे) पक्षातून उमेदवारीवर लक्ष ठेवून माजी आमदार मनीषा निमकर यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे. बोईसर ची जागा भाजपाच्या वाट्याला सुटेल या आशेवर बसलेले विलास तरे आहेत. मात्र महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर निर्णय होऊन पालघर व बोईसर ची जागा शिवसेना (शिंदे) पक्षाकडे जाण्याचे जवळपास निश्चित होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला शिवसेना (शिंदे) पक्षाकडून उमेदवारी लढवण्यासाठी विलास तरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तर मनीषा निमकर यांनी बोईसर मधून उमेदवारी मिळाली नाही तर पालघर मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे.

विक्रमगड मतदार संघ आपल्याला मिळावा म्हणून भाजपा, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष प्रयत्न करीत आहेत. जागा वाटपात विक्रमगड ची जागा भाजपाला मिळाल्यास आयात उमेदवारा ऐवजी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याचे भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेले सहा – आठ महिने भाजपा तर्फे विक्रमगड विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे. भाजपातर्फे केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात प्रकाश निकम यांचे नाव पुढे आल्यास त्यांना भाजपा प्रवेश करणे गरजेचे ठरणार असून अन्यथा अपक्ष निवडणूक लढविणे किंवा अन्य स्थानीय पक्षांमध्ये पक्षांतर करणे अपरिहार्य ठरणार आहे. काँग्रेस – शिवसेना – काँग्रेस असा प्रवास करणारे माजी खासदार कै. दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांनी मनसे मधून विक्रमगड विधानसभेची जागा लढवण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अनेक वर्ष काँग्रेसशी असणाऱ्या पारिवारिक संबंधाला सोडून त्यांना मनसेचा मार्ग अवलंबिणे भाग पडणार आहे.

आणखी वाचा-अकोला पूर्व’तून रणधीर सावरकर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात; भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत मानाचे स्थान

महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये पालघर, बोईसर, विक्रमगड व डहाणू मधून अनेक इच्छुक उमेदवार असून निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी सुरू होण्याच्या तोंडावर पक्षाने आयात उमेदवार देण्याचे निश्चित केल्यास गेल्या सहा-आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरेल अशी शक्यता निर्माण झाल्याने त्यांच्या पोटात गोळा आला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे समर्थकांच्या मदतीने आपले नाव उमेदवारीसाठी रेटून नेण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून पुढील काही दिवसात अनिश्चिततेचे वातावरण कायम राहील अशी शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Transposition of leaders from one party to another party in palghar print politics news mrj

First published on: 21-10-2024 at 11:37 IST

संबंधित बातम्या