तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तापस रॉय यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, सोमवारी (४ मार्च) आमदारपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर तापस रॉय यांनी बुधवार (६ मार्च) भाजपात प्रवेश घेतला. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्याच्या भाजपा प्रवेशाने तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, पक्षाचे बंगाल निरीक्षक मंगल पांडे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थित रॉय यांनी पक्षप्रवेश केला. रॉय यांना कोलकाता उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपामध्ये सामील झाल्यानंतर रॉय म्हणाले, “आजपासून मी भाजपा परिवाराचा सदस्य होणार आहे. पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी देईल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आज राज्यात सत्ताधारी असलेल्या अराजकतावादी (टिएमसी) सरकारला हटवून आपण सर्वांनी मिळून शांततामय बंगालची निर्मिती करायची आहे. यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन,” असे रॉय म्हणाले.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष

तृणमूल काँग्रेसवर आरोप

तापस रॉय यांनी बारानगरच्या आमदारपदाचा राजीनामा पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. संकटकाळात पक्ष पाठीशी उभा राहिला नाही, असा आरोपही त्यांनी केला. राजीनामा दिल्यानंतर रॉय म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहे. परंतु मला माझ्या हक्काचे काहीच मिळाले नाही. तापस रॉय पक्षावर नाराज असल्याची आणि त्यांच्या राजीनाम्याची चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती.

तापस रॉय कोण आहेत?

रॉय, पाच वेळा आमदार राहिले आहेत. १९९६ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये असतांना २००१, २०११, २०१६ आणि २०२१ अशा चार वेळा ते पश्चिम बंगाल विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. रॉय विधानसभेत टीएमसी चे डेप्युटी चीफ व्हिप आणि पक्षाच्या डमडम-बराकपूर संघटनात्मक जिल्ह्याचे अध्यक्षही होते. रॉय यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपाचे बालूरघाटचे खासदार सुकांता मजुमदार म्हणाले, “तापस रॉय यांना पक्षात सामील करण्यात आम्हाला आनंद होत आहे. रॉय यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा आणि अनुभवी नेता पक्षात येणे ही आनंदाची गोष्ट आहे.”

सुवेंदू अधिकारी म्हणाले की, माजी टीएमसी नेत्याला सामील करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आला. “रॉय एक प्रयत्नशील आणि विश्वासू राजकीय नेते आहेत. पूर्वी त्यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्याही सांभाळल्या. कोलकाता आणि आजूबाजूच्या भागात आमच्या पक्षाचे अनेक समर्थक आहेत पण या भागात पुरेसे विश्वासार्ह नेते नाहीत. त्यामुळे ही पोकळी रॉय भरून काढतील असा आम्हाला विश्वास आहे. कोलकाता आणि आसपासचे संघटन मजबूत करण्यासाठी आम्हाला त्यांच्यासारख्याच नेत्याची पक्षात गरज होती,” असे अधिकारी म्हणाले.

हेही वाचा : दिल्लीचा अर्थसंकल्प रामराज्य आणि रामायणाने प्रेरित; लोकसभा निवडणुकीत होणार फायदा?

टीएमसीची प्रतिक्रिया

टीएमसीने रॉय यांच्या भाजपा प्रवेशावर टीका केली. टीएमसीचे ज्येष्ठ नेते शांतनू सेन म्हणाले की, रॉय यांनी ईडी आणि सीबीआयच्या चौकशीतून सुटण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. “त्यांनी त्यांच्या आदर्शांशी तडजोड केली आहे. ज्या पक्षाने त्यांना चार वेळा आमदार, राज्यमंत्री आणि विधानसभेत पक्षाचे उपमुख्य व्हीप बनवले त्याच पक्षाशी त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यांनी भाजपपुढे शरणागती पत्करली आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. बंगालची जनता त्यांच्यासारख्या विश्वासघात करणाऱ्या नेत्याला माफ करणार नाही,” असे सेन म्हणाले.

Story img Loader