त्रिपुरामधील पोटनिवडणूकीत दारुण पराभवाला सामोरे गेल्यानंतर चार महिन्यांनंतर तृणमुल काँग्रेसने आगामी वर्षातील विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. “तुम्ही भाजपाला संधी दिली. मात्र, ते विकास करू शकले नाहीत. वाईट गोष्टींची दोनदा चाचपणी करण्याची गरज नाही. त्यामुळे आता एक संधी तृणमुल काँग्रेसला द्या”, असे आवाहन अगरताळातील रबिंद्र शतबर्शिकी भवनात आयोजित सभेत टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करा, तरच…”, ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँग्रेसमध्ये पुन्हा धुसफूस

भाजपा खोट्या आश्वासनांवर जिंकू शकणार नाही. भाजपाने राज्यासाठी काय केलं आहे, हे जनतेला पाच वर्षांच्या अनुभवातून कळले असेल, अशी टीका यावेळी मोईत्रा यांनी केली. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामधील सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला टक्कर देण्यासाठी लोकांना पर्याय हवा होता आणि म्हणूनच त्यांनी भाजपाला मतदान केले, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे. “त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना पाच वर्षही सरकार चालवता आले नाही. त्यामुळे या राज्यात भाजपाकडून खांदेपालट करण्यात आली” हे सांगताना सलग तिसऱ्यांदा तृणमुल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये यशस्वीरित्या सरकार चालवत आहे, असे मोईत्रा म्हणाल्या.

ओडिशामध्ये एका जागेसाठी रंगणार राजकीय आखाडा, ‘पदमपूर’मध्ये भाजपा विरुद्ध बीजेडी अशी थेट लढत; कोण मारणार बाजी?

गुजरातमध्ये सामूहिक अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे वाढत असताना पश्चिम बंगालमध्ये कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. त्रिपुरात टीएमसीचे सरकार आल्यास पश्चिम बंगालच्या धर्तीवर कल्याणकारी योजना राबवण्यात येतील, असे आश्वासन मोईत्रा यांनी दिले आहे. दरम्यान, सीपीआयचा(एम) भाजपाशी छुपा संबंध असल्याचा आरोपही टीएमसी नेत्यांकडून करण्यात येत आहे.

कारवर चढून स्टंटबाजी, ‘पॅकेज स्टार’ म्हणल्यावरून चपलेने मारण्याचा इशारा; पवन कल्याण सातत्याने चर्चेत का असतात?

गेल्या काही काळापासून त्रिपुरात प्रभाव वाढवण्यासाठी टीएमसीकडून प्रयत्न केले जात आहेत. २०१६ मध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये टीएमसीने १६.३९ टक्के मतं मिळवली होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकीत टीएमसीला केवळ तीन टक्के मतांवर समाधान मानावे लागले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trinamool congress urging voters in tripura to elect it in upcoming assembly election rvs
Show comments