तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघामध्ये पुढील आमदारकीसाठी खासदार-आमदार पुत्रामध्ये सामना रंगतदार बनत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन हेही चाचपणी करत आहेत. यामुळे या मतदार संघातील संघर्ष दुहेरी न राहता तिहेरी होण्याच्या मार्गावर आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावे खानापूर-आटपाडी मतदार संघात समाविष्ट असल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकीय वर्चस्व कोणाचे यावरच पुढील गणित अवलंबून राहणार आहेत.

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदी ते अटलबिहारी वाजपेयी: लाखो अनुयायी असलेल्या आसाराम बापूच्या साम्राज्याला उतरती कळा कशी लागली?

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
ISRO New chairman Dr V Narayanan
ISRO New Chairman : डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवे प्रमुख, १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या गटाचा राष्ट्रवादीच्या आरआर आबा गटाशी सामना झाला. तासगाव नगरपालिकेमध्ये भाजपचा पर्यायाने खासदार गटाचे प्राबल्य असले तरी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. नुकत्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आबा गटाला ग्रामीण भागाची साथ असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>>लडाख जम्मू काश्मीरमध्ये असताना जास्त सुखात होतं; सोनम वांगचूक मोदी सरकारच्या धोरणांवर नाराज

गेल्या तीन-चार वर्षापासून खासदार गट कवठेमहांकाळ तालुक्यात अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे. यातूनच बाजार समिती, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीमध्ये कधी तडजोड करून तर कधी संघर्ष करून अस्तित्व दर्शविण्याचे प्रयत्न सुरू असतात. मात्र, कवठेमहांकाळ तालुक्यात मूळचा राजकीय संघर्ष हा घोरपडे यांच्या विकास आघाडीचाच राहिला आहे. आता या आघाडीचे नामकरण शेतकरी विकास आघाडी असे करण्यात आले असून नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये खासदार गटाने या विकास आघाडीबरोबरच तडजोड करीत निवडणुक लढविली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवत दिग्गज नेत्यांना पराभूत केले होते. मात्र आबा गटाचे रोहित पाटील यांना हे यश कायम राखता आले नाही. यामुळे एक वर्ष होण्यापुर्वीच नगरपंचायतीमध्ये सत्तांतर करीत खासदार गटाने नगराध्यक्ष पद हस्तगत केले.

कवठेमहांकाळमध्ये घोरपडे यांचे आतापर्यंतचे सर्व राजकारण हे विविध पक्षाच्या माध्यमातून झाले आहे. कधी अपक्ष, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी तर कधी भाजप अशी त्यांची वाटचाल सुरू असते. मात्र, त्यांचा असा स्वत:चा एक गट गावपातळीवर कार्यरत असतो. या ताकदीवरच त्यांनी जिल्हा परिषद, बाजार समिती, पंचायत समितीमध्ये सत्तेत स्थान मिळविण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. या मतदार संघामध्ये जोपर्यंत मिरज तालुक्यातील पूर्व भागातील २९ गावांचा समावेश होता, तोपर्यंत घोरपडे गटाची ताकद लक्षणीय होती. मात्र, मतदार संघ पुनर्रचनेनंतर घोरपडे गटाला अस्तित्वासाठी कायम संघर्षच करावा लागला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये घोरपडे यांनी आपला प्रभाव आजही कायम असल्याचे दाखवला आहे.

हेही वाचा >>>Budget 2023: शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये किती कपात झाली? मनरेगामध्ये मोदी सरकारचा रस उरला नाही?

पुढची पिढी रिंगणात
तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघासाठी खासदार पुत्र प्रभाकर पाटील आणि आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्यात चुरस दिसत असतानाच घोरपडे गट पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सांगली बाजार समिती यांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होतील. आगामी विधानसभेची ही पायाभरणी असल्याने आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मणेराजुरी येथे नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत घेतला होता. आपला गट शाबूत राखण्यासाठी घोरपडे गटानेही शेतकरी मेळावा घेऊन ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला.

घोरपडे यांचा कल कोठे ?
या पार्श्‍वभूमीवर काका आबा गटाच्या राजकीय संघर्षामध्ये कवळेमहांकाळच्या घोरपडे गटाचा विकास आघाडीचाही तिसरा कोन या राजकीय संघर्षाला असण्याची शक्यता बळावली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीची निवडणूक समोर ठेवून घोरपडे गटाची मोर्चेबांधणी नूतन पदाधिकार्‍यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सुरू झाली आहे. घोरपडे यांनी राज्य पातळीवर शिवसेनेत प्रवेश करून गेल्या वेळी विधानसभेची निवडणुक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली होती. तत्पुर्वी ते भाजपमध्ये होते. शिवसेनेत सध्या ठाकरे सेना व शिंदे सेना असे दोन गट असले तरी घोरपडे कोणत्या गटात हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader