त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली आहे. ही निवडणूक लक्षात घेता सर्वपक्षीय नेत्यांकडून राजकीय डावपचे आखले जात आहेत. या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षानेही कंबर कसली आहे. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहोत. भाजपाच्या पराभवासाठी आवश्यकतेनुसार कोणत्याही पक्षाशी आघाडी करू, असे काँग्रेसचे नेते सुदीप रॉय बर्मन म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> एकाचवेळी दोन ठरावांच्या मंजुरीमुळे काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडीच्या गुंतागुंतीत वाढ
भाजपाला पराभूत करण्यासाठी जे-जे गरजेचे आहेत ते सर्व केले जाईल. भाजपाच्या कुशासनापासून जनतेची सुटका करण्यासाठी इतर पक्षांशी आम्ही युती करू, असे बर्मन म्हणाले. भाजपाने काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांवर हिंसाचाराचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे बर्मन यांनी CPM आणि TIPRA Motha या पक्षांना हातमीळवणीचे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>> महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये घेण्यात आला आहे ‘हा’ मोठा निर्णय, देशात असं पहिल्यांदाच घडणार
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्यूनिष्ट पक्ष अर्थात CPM ने याआधी केले होते. मात्र बर्मन यांनी युतीचे आवाहन केल्यानंतर विरोधातील कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृतपणे प्रतिसाद दिलेला नाही. दुसरीकडे सध्या सत्तेत असलेल्या भाजपाने विरोधकांचा युती करण्याचा मनसुबा यशस्वी होणार नाही, असा दावा केला आहे.
हेही वाचा >>> काश्मीर संस्थानचा शासक राजा हरी सिंहची जयंती जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित
दरम्यान, काँग्रेसने विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर भाजपाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सीपीएमने काँग्रेवर शेकडो आरोप केले होते. आता काँग्रेसचे नेते सीपीएमसोबत हातमीळवणी करत असून ही बाब जनता कधीही विसरणार नाही. आगामी निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचे हे जनताच ठरवेल, असे भाजपाचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य म्हणाले आहेत.