Tripura Assembly Election : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह सर्वच स्थानिक पक्षांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ देखील त्रिपुरा दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज त्यांनी त्रिपुरातल्या खोवाई येथील एका सभेला संबधित केलं. यावेळी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्यनाथ म्हणाले की, “त्रिपुराचा विकास आधी झाला असता, परंतु कम्युनिस्टांनी केला नाही. काँग्रेसने देखील केला नाही. कारण विकास हा त्यांचा अजेंडाच नव्हता. केवळ घुसखोरी वाढवायची, इथली सुरक्षितता धोक्यात आणायची, गोरगरिबांसाठी असलेल्या सरकारी योजनांची लूट करायची, हाच त्यांचा अजेंडा होता.”

त्यांना रामाच्या अस्तित्वावर शंका

आदित्यनाथ म्हणाले की, “काँग्रेस पार्टी राम आणि कृष्णाच्या अस्तित्वार प्रश्न उपस्थित करायची. तर कम्युनिस्ट पार्टी देशातल्या लोकांच्या भावनांशी खेळत होती. आता उत्तर प्रदेशात दंगली होत नाहीत. कारण आमच्या सरकारने विकास केला आहे.”

हे ही वाचा >> “लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त ४०० दिवस..” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिला कानमंत्र

काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी विकास होऊ दिला नाही

आदित्यनाथ म्हणाले की, ” कांग्रेस आणि कम्युनिस्ट नेत्यांनी गरिबांच्या योजना लुटल्या. त्यांना कुठल्याही योजनांचा लाभ होऊ दिला नाही. दोन्ही पक्षांनी दरोडे टाकण्याचं काम केलं, परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये दुहेरी इंजिन असलेल्या आमच्या सरकारने उत्तम काम केलं. लाखो कुटुंबांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन दिलं. हे अगोदर देखील झालं असतं. परंतु काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी होऊ दिलं नाही.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tripura poll cong cpim dont believe in existence of ram and krishna says yogi adityanath asc