त्रिपुरा राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या संसदीय पथकावर शुक्रवारी सिपाहीजाला जिल्ह्यात हल्ला झाला. यावेळी काही हल्लेखोरांनी ‘जय श्री राम’ असे नारे दिले आणि पथकाच्या गाड्यांची तोडफोड केली, असा आरोप संसदिय पथकामधील डाव्या आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. पथकातील एका खासदाराने आरोप केला की, त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हा हल्ला रोखण्यासाठी कोणताही हस्तक्षेप केला नाही. या घटनेनंतर माकपचे प्रदेश सचिव जितेंद्र चौधरी यांनी सात खासदारांचा समावेश असलेल्या तीन पथकाचा दोन दिवसीय दौरा रद्द करण्याची घोषणा केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, डावे आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या पथकाने नेहालचंद्रनगर येथे दिलेली भेट नियोजित वेळापत्रकानुसार नव्हती. यावेळी काही लोकांनी घोषणाबाजी केल्याची माहिती मिळत आहे. साहाय्यक पोलीस महासंचालक ज्योतिषमान दास चौधरी यांनी पथकासोबत असलेल्या पोलिसांनी हल्ला रोखला नसल्याचा आरोप फेटाळून लावला. ताफ्यात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हालचाल करून पथकातील सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी कुणालाही इजा पोहोचली नसल्याचे लक्षात आले. दोन ते तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. हल्लेखोरांपैकी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच इतर आरोपींना अटक करण्यासाठी धाडी टाकण्यात येत आहेत.

50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

२ मार्च रोजी विधानसभा निवडणूक निकालांची घोषणा झाल्यानंतर त्रिपुरामध्ये काही ठिकाणी हिंसाचार उफाळला होता. याची चौकशी करण्यासाठी डावे पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूमधील काही खासदार याठिकाणी आले होते. या खासदारांची तीन पथकात विभागणी करून त्यांना सिपाहीजाला, गोमती, पश्चिम त्रिपुरा, खोवाई आणि धलाई या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या भागात तपासणी करण्यास सांगितले होते.

माकपचे राज्यसभेतील खासदार इलाराम करीम (MP Elaram Karim) आणि काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अब्दुल खलेक (MP Abdul Khalek) यांचे पथक सिपाहीजाला जिल्ह्यातील विशालगड आणि पश्चिम त्रिपुरामधील भागांना भेट देणार होते. तर दुसऱ्या पथकातील काँग्रेसचे लोकसभेतील खासदार रंजिता रंजन (MP Ranjita Ranjan), माकपचे राज्यसभेतील खासदार ए. ए. रहिम (MP A A Rahim) आणि खासदार बिकाश भट्टाचार्य (MP Bikash Ranjan Bhattacharyya) पश्चिम त्रिपुरामधील कालकैला याठिकाणी भेट देणार होते. तर तिसऱ्या पथकातील माकपचे लोकसभेतील खासदार पी. आर. नटराजन (MP P R Natarajan) आणि खासदार बिनॉय बिस्वाम (MP Binoy Biswam) हे दुर्गाबारी, उशाबाझार, कालिकापुर या भागात दौरा करणार होते. या पथकासोबत माजी मुख्यमंत्री मानिक सरकार आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष पबित्र कार हेदेखील होते.

करीम आणि खलेक यांच्या पथकासोबत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) त्रिपुरा प्रभारी डॉ. अजय कुमार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बिरजीत सिन्हा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाल चंद्रा रॉय आणि जितेंद्र चौधरी हे उपस्थित होते. घटनास्थळावरून परत येत असताना खासदार अब्दुल खलेक म्हणाले, “आम्ही सत्यशोधन करण्यासाठी जात असताना काही लोकांनी विशालगडमधील नेहलचंद्रनगरमध्ये सुमारे २० दुकानांचे नुकसान झाल्याची आम्हाला माहिती दिली. या माहितीच्या आधारे चौकशी करण्यासाठी आम्ही त्याठिकाणी पोहोचलो. तेव्हा काही लोक तिथे आले. ते म्हणाले, आम्ही भाजपाचे समर्थक आहोत. त्यांनी दावा केली की, त्यांच्या दुकानांना काहीही झालेले नाही. आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांच्याकडून दगडफेक सुरू झाली. यामध्ये आमच्या चार वाहनांचे नुकसान झाले. यावेळी आमच्यासोबत उपस्थित असलेल्या पोलिसांनी काहीही हालचाल केली नाही.”

खासदार रंजिता रंजन म्हणाल्या की, त्रिपुरामध्ये दिवसाढवळ्या खुलेआम गुंडगिरी सुरू आहे. विरोधक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यावर हल्ले केले जातात. त्रिपुरामध्ये सात खासदार आणि काही आमदार जर सुरक्षित नसतील तर सामान्य जनता कशी सुरक्षित असू शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

माकपने राज्य प्रशासनाला एक पत्र लिहून या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास सत्ताधारी भाजपा असमर्थ असल्याचे म्हटले. माकप आणि काँग्रेसच्या मतानुसार, २ मार्चनंतर राज्यात जवळपास ६३८ ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागात खंडणी, लूटमार, जाळपोळ आणि हल्ल्याच्या घटनांचा समावेश आहे. तसेच या हल्ल्यातील काही आरोपींना ताब्यात घेऊन लगेच सोडण्यात आल्याचाही आरोप यावेळी दोन्ही पक्षांनी केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात १५० ठिकाणी छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास एक हजार लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच १० लोकांना अटक करण्यात आली आहे. यावेळी विरोधकांच्या आरोपांवर एकाही भाजपाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.

Story img Loader