त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांचा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. त्रिपुरामध्ये अचानक नेतृत्व बदल करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आणि माणिक सहा यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणिक सहा यांनी बारडोवली मतदार संघातून निवडणूक लढवली. ही निवडणूक माणिक सहा यांनी लढवलेली त्यांच्या आयुष्यातील पहिली थेट निवडणूक होती. त्रिपुरात एकूण चार जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली होती.चारपैकी तीन जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. ६९ वर्षीय माणिक सहा हे दंत शल्यचिकित्सक आहेत. वैद्यकीय क्षेत्रातून राजकारणात आलेले साहा हे राज्यसभा सदस्य होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती.
त्रिपुरा पोटनिवडणूक ही गटबाजीने ग्रासलेल्या भाजपसाठी तसेच मुख्यमंत्री माणिक सहा यांच्यासाठी एक मोठी चाचणी होती. या निवडणुकीच्या निकाललावर फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीची दीशा ठरणार आहे. मुख्यमंत्री सहा यांना स्वतःची जागा पक्की करण्यासाठी ही निवडणूक जिंकणे गरजेचे होते. सहा यांच्या नियुक्तीनंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आले होते. त्यामुळे हायकमांडचा त्यांच्यावर असलेला विश्वास टिकुन रहावा यासाठी त्यांना निवडणुकीत निवडून येणे गरजेचे होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा