Congress MLAs praises of Haryana CM Saini : काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची स्तुती केल्याने हरियाणाच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. “कर्मठ मुख्यमंत्री, बहुत बढीया मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे अंत:करणापासून धन्यवाद”, अशा शब्दात काँग्रेसचे काही नेते हरियाणाच्या मुख्यमंत्र्‍यांचे कौतुक करत असल्याने हरियाणात राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसचे आमदार शल्ली चौधरी (नारायणगड) आणि गोकुळ सेतिया (सिरसा) यांनी यांनी हरियाणामध्ये सरकार स्थापन झाल्याच्या तीन महिन्यांतच मुख्यमंत्री सैनी यांची स्तुती करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे काँग्रेसचे काही नेते भाजपात सामिल होण्याची संधी शोधत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या आमदारांनी तसचे भाजपाच्या नेत्यांनी देखील अशी शक्यता फेटाळून लावली आहे. सैनी हे नारायणगड आणि सिरसा या ठिकाणी दौऱ्यावर आले होते त्यावेळी ही स्तुती करण्यात आली. या दौऱ्यात सैनी यांनी या भागासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला

जानेवारी २० रोजी सैनी आणि चौधरी हे नारायणगड येथे एका मंचावर आले होते. यावेळी काँग्रेसचे आमदार चौधरी म्हणाले की, “आपल्याला इतके मेहनती मुख्यमंत्री मिळाले आहेत ही नारायणगडसाठी गौरवाची बाब आहे. आम्ही भाग्यवान आहोत की तो येथून पुढे आले आहेत. फक्त नारायणगडच नाही तर संपूर्ण राज्यातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. आमचा मतदारसंघ राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने मागे होता. एक (राजकीय) उणीव दूर करण्यात आली आहे कारण सैनी येथून पुढे आले आहेत परंतु विकासाच्या संदर्भात, मी त्यांना आमच्या इतर मागण्या पूर्ण करण्याची विनंती करू इच्छितो”, यावेळी हरियाणाचे माजी मंत्री असेम गोयल यांच्यासह इतर भाजपाचे नेतेही उपस्थित होते.

आपल्या नारायणगड मतदारसंघासाठी ट्रॉमा सेंटर, मेडिकल कॉलेज आणि गावातील पंचायतींसाठी निधी इत्यादीमागण्या केल्यानंतरही चौधरी सैनी यांची स्तुती करत राहिल्या. इतकेच नाही तर त्यांनी सैनी यांचा नारयणगडचे सुपूत्र असा उल्लेख देखील केला

त्याच दिवशी सैनी यांनी ४३.२८ कोटी रुपयांच्या १० विकास प्रकल्पाचे भूमीपूजन केले. तसेच त्यांनी या भागात सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा देखील केली. यासह हॉटिकल्चर कॉलेज, हॉकीसाठी अस्ट्रोटर्फ, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच गावांच्या विकासासाठी २० कोटींचा निधीही जाहीर करण्यात आला.

सिरसा येथे सेतिया यांनी सैनी आणि भाजपाच्या नेत्यांचे व्यासपीठावर स्वागत केले. यावेळी त्यांनी एक प्रसंग देखील सांगितलं. “मी उपायुक्तांना विनंदी केली होती की मला मुख्यमंत्र्यांचे स्वागत करायचे आहे. पण मला आत (विमानतळात) जाण्याची परवानगी नव्हती. जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना मी बाहेर थांबल्याबद्दल समजले तेव्हा त्यांनी माझी तीन मिनिटं वाट पाहिली, मी शपथ घेऊन सांगतो की, माझा इतका सन्मान करणारा दुसरा व्यक्ती मी आजवर पाहिला नाही”.

हरियाणामध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपा सत्तेत आले. यानंतर सैनी यांनी नोव्हेंबरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली होती. “मझा लक्षात आहे की नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर मी एक विनंती केली होती. तेव्ह तुम्ही मला कोणताही भेदभाव न करता राज्यभर समान विकास होईल असे आश्वासन दिले… आम्हाला एक दर्जेदार मुख्यमंत्री मिळाले आहेत. चांगल्या कामाचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मी विधानसभेतही म्हटले होते. केवळ मी विरोधी पक्षात आहे म्हणून मला सरकारचे चुका शोधत बसायचे नाही. गोकुळ सेटिया चांगल्या कामाचे नेहमीच कौतुक करले. यामुळे सरकार चालवणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो”, असे म्हणत सेतिया यांनी हात जोडून सैनी यांचे आभार मानले.

विशेष बाब म्हणजे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेसच्या आमदाराने हे कौतुक केले. काँग्रेस पक्षात भुपिंदर सिंह हुड्डा गट आणि इतर गटांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यामुळे काँग्रेस पक्षाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभेत विरोधीपक्ष नेता म्हणून काम करेल असा विधीमंडळ पक्षाचा नेता देखील काँग्रेसने अद्याप निवडला नाही.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्यावर सैनी यांनी नोव्हेंबरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली . “मला आठवते नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर मी एक विनंती केली होती. तुम्ही मला कोणताही भेदभाव न करता राज्यभर समान विकासाचे आश्वासन दिले… आमच्याकडे एक उत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत. चांगल्या कामाचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मी विधानसभेतही म्हटले होते. केवळ मी विरोधी पक्षात आहे म्हणून मला कोणत्याही पक्षाच्या रेषेवर बोट ठेवायचे नाही आणि सरकारचे दोष शोधत राहायचे नाही. गोकुळ सेटिया चांगल्या कामाचे नेहमीच कौतुक करतील. यामुळे सरकार चालवणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो,” सेतिया यांनी हात जोडून सैनी यांचे आभार मानले.

गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काही महिन्यांनी अशी भव्य स्तुती केली जाते, ही निवडणूक जिंकण्याची अनेकांना अपेक्षा होती. आधीच घर व्यवस्थित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि भूपिंदरसिंग हुडा कॅम्प आणि इतर प्रतिस्पर्धी गटांमधील भांडणामुळे पक्षाला आणखी त्रास होण्याची शक्यता आहे. पक्षाने अद्याप आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केलेली नाही, जो विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करेल.

५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून जाट समुदायाचे प्रतिनिधीत्व करणारे हुड्डा आणि हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांना पक्षाने वगळले. यानंतर काँग्रेस पक्षातील दुफळी समोर आली होती. या प्रचारकांच्या यादीत राज्यसभा खासदार रणदीप सिंग सुरजेवाला आणि कुमारी सेलजा या नेत्यांचा समावेश होता. दिल्लीत जाट समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसू शकतो.

पक्षांतर्गत वादासंबंधी तसेच मुख्यमंत्र्याचे कौतुक केल्याबद्दल प्रश्न विचारला असता, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “सरकार प्रमुख असलेल्या व्यक्तीबद्दल एका आमदारांची आदराची भावना आहे. त्यात आणखी काही शोधू नये. काँग्रेस एकजूट आहे आणि पक्षात कुठलीही फूट नाही”

Story img Loader