Vidhan Sabha Election 2024 : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना मोठे मताधिक्य देणाऱ्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचा कल महाविकास आघाडीकडे दिसून आला आहे. याठिकाणी काँग्रेसचा आमदार असला तरी शिवसेनेकडून येथे दावा केला जाण्याची शक्यता आहे.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. विधानसभेच्या १९८० पासून २००४ पर्यंत झालेल्या निवडणुकीत मुंबादेवी मतदारसंघ भाजपने राखला होता. मात्र २००९ मधील निवडणुकीत काँग्रेसच्या अमिन पटेल यांनी भाजपला धक्का देऊन हा मतदारसंघ जिंकला आणि नंतर दोन निवडणुकीत तो राखला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ‘भोले बाबा’वर आरोप का नाही? काँग्रेस-बसपा आक्रमक; भाजपा-सपाचा सावध पवित्रा

लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भरभरून मते दिली. त्यांच्या प्रतिस्पर्धी यामिनी जाधव या मुंबादेवीतून ४०,८३३ मतांनी पिछाडीवर राहिल्या. सावंत यांच्या विजयात मुंबादेवीतील मताधिक्याचा मोठा वाटा आहे. यामध्ये केवळ काँग्रेसचीच मतपेढी नसून मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मुस्लीम समाजात निर्माण झालेली प्रतिमा आणि शिंदे गटाच्या फुटीनंतर मिळत असलेली सहानुभूती या गोष्टीही कारणीभूत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

हेही वाचा >>> अयोध्येनंतर बद्रीनाथमध्येही भाजपाचा पराभव; उत्तराखंडमध्ये पुनरागमनाची काँग्रेसला अपेक्षा

विधानसभेच्या मागील एका निवडणुकीत मतदारसंघांच्या वाटाघाटीत मुंबादेवी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. मात्र त्यावेळी शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला असून देवरा समर्थकांनी मोठ्या संख्येने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अमिन पटेल हेही देवरा समर्थक म्हणून ओळखले जातात. परंतु ते अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे पटेल यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की अन्य व्यक्तीला उमेदवारी द्यायची अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे.

Story img Loader