सध्या कॉंग्रेस पक्षाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. राजकीय वर्चस्व टिकवण्यासोबतच पक्षांतर्गत वाद कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींची डोकेदुखी वाढवत आहेत. पक्षातील जुने आणि नवीन नेते यांच्यातील वाद अनेकवेळा चव्हाट्यावर आले आहेत. अश्यावेळी सध्याच्या राजकीय वातवरणात पक्षाला मजबूत करायचं असेल तर जुने आणि नवीन हा समतोल राखण गरजेचं असल्याचं कॉंग्रेस नेतृत्वाच्या लक्षात आलं आहं. त्यामुळेच कॉंग्रेसच्या उदयपूर येथील चिंतन शिबिरात यासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कॉंग्रेसने याबाबत एक पक्षांतर्गत समतोल कायदा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यानुसार पक्षातील तरुण नेत्यांना कॉंग्रेस वर्किंग कमिटी आणि इतर संघटनात्मक स्तरावर ५० % प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. तसंच सध्या कॉंग्रेस वर्किंग कमिटीमधून काढुन टाकलेल्या ज्येष्ठ नेत्यांची एक सल्लागार समिती बनवण्यात येणार आहे. दिग्गज आणि तरुण नेते या दोघांनाही खुष ठेवण्यासाठी सोनिया गांधी यांनी या निर्णय घेतल्याच बोललं जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा