कोल्हापूर : आताची लढाई महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यातील आहे. सर्व महाराष्ट्रप्रेमी हे महाविकास आघाडीसोबत आहेत. मोदी, शहा यांच्या पालख्या वाहतो तो महाराष्ट्राचा शत्रू आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीकास्त्र डागले.

राधानगरी मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ ठाकरे यांच्या हस्ते झाला. या वेळी ते म्हणाले, की आज या भागातील लोकांनी येथील पाणी अदानीला विकले गेले असे सांगितले. मला वाटते, की मुंबईतील धारावीची जमीन विकली आहे. चंद्रपुरातील शाळाही अदानींना दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हा काही जणू अदानींना विकला जातोय. आपण त्याकडे उघड्या डोळ्यांनी बघत बसणार काय, असा सवाल त्यांनी केला.

loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Maharashtra Assembly Election 2024 _ BJP
Assembly Election: भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला; ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हेही वाचा >>>Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?

फुटीर आमदार प्रकाश आबिटकर यांचा संदर्भ देऊन ठाकरे यांनी पक्षाने सगळे देऊनसुद्धा शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा तुमचा माणूस होऊ शकत नाही. अशा गद्दाराला पराभूत करा, असे आवाहन केले.

‘जाऊ तेथे खाऊ’ अशा स्वरूपाचे राज्यातील महायुतीचे सरकार आहे. सुविधांच्या नावाखाली निविदा काढून मक्तेदारांच्या माध्यमातून पैसे खायचे आणि दुसरीकडे महागाई वाढवायची. तिसऱ्या बाजूने महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडायची. राज्य विकून टाकायचे. गुजरातला सगळे विकून टाकायचे असा प्रकार सुरू असल्याची टीका ठाकरे यांनी केली. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ दिला नव्हता. त्यांनी आपले सरकार पाडले. त्यांची ही गद्दारी उद्धव ठाकरे, शिवसेनेशी केली नाही, तर महाराष्ट्रासोबत केली आहे. कारण त्यांना महाराष्ट्र लुटून घ्यायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >>>Uddhav Thackeray : “मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

महिला पोलिसांची भरती करणार

आम्ही सत्तेत आल्यावर ‘लाडकी बहिणी’पेक्षा महिलांच्या सुरक्षेस प्राधान्य देणार आहोत. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. सत्तेत आल्यावर महिला पोलिसांची रखडलेली भरती आम्ही तातडीने करणार, तसेच प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याची घोषणा या वेळी ठाकरे यांनी केली.