नगरः बऱ्याच मोठ्या काळानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने नगरमध्ये मेळावा आयोजित केला होता. करोना संसर्गापूर्वी ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी नगरचा दौरा केला होता. त्यानंतर कोणताही वरिष्ठ नेता नगरकडे फिरकला नव्हता. शिवसेनेत फूट पडली, नगर जिल्ह्यात काही प्रमाणात पडझड झाली तरीही कोणत्याही नेत्याने नगरकडे लक्ष दिले नव्हते. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध घेत ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नगरमध्ये मेळावा घेतला व ठाकरे गटाला सक्रिय करण्याचा प्रयत्न केला सुरू केले. खासदार राऊत यांनी स्वतःच नगरची जबाबदारी आता माझ्याकडे असल्याचे स्पष्ट केले.

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे ठाकरे किंवा शिंदे गटाचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे संसदेत गेले, त्यांनी सुरुवातीला ठाकरे गटाकडे राहण्याचा निर्णय जाहीर करत नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. जुन्या ऋणानुबंधाच्या परतफेडीच्या भावनेने नगर शहरातील चार-पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला, मात्र ठाकरे गटाकडील महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अबाधित राहिले. महापालिकेतील सत्तेमुळे ठाकरे गटाची नगर शहरात मोठी पडझड टळली. खासदार लोखंडे यांच्याबरोबर जाणेही अपवाद वगळता निष्ठावानांनी टाळले.

raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Raj Thackeray on chhava movie Video
Raj Thackeray: “छत्रपती संभाजी महाराजांनी कधीतरी लेझीम…”, ‘छावा’चित्रपटावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका

हेही वाचा – नाशिक शिवसेनेच्या ठाकरे की शिंदे गटाचे ?

असे असतानाही संघटनात्मक बांधणीच्या पातळीवर ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच्या काळातही नगरकडे फिरकलेले नाहीत. उलट संपर्कप्रमुखांच्या नियुक्ती वारंवार बदलत धरसोडच अधिक केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी इच्छुक राहिलेल्या नाराज बबनराव घोलप यांच्या राजीनाम्यानंतर वर्षापूर्वी ही जबाबदारी मुंबईतील आमदार सुनील शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संपर्कप्रमुख आमदार शिंदे यांनीही नगरकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली देताना फारशी पडझड न झाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आम्ही विश्वास ठेवल्याचे मान्य केले. मात्र त्याचवेळी खासदार राऊत यांच्या पहिल्याच दौऱ्यात काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ते आणि संपर्क प्रमुख शिंदे यांच्याकडे शहर संघटनेत बदल करण्याची मागणी रेटली, हे विशेष. ही मागणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दोघांनीही निवडणुकीचे कारण देत सबुरी ठेवण्याचा सल्ला दिला.

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नगर दौऱ्यावर येण्यापूर्वी शिर्डीत बोलताना खासदार राऊत यांनी शिर्डीबरोबरच नगरची ही जागा लढवण्यास ठाकरे गट इच्छुक असल्याचे सांगत आमदार शंकरराव गडाख उमेदवार होऊ शकतात, असे सुचित केले. आमदार शंकरराव गडाख अपक्ष म्हणून निवडूण आले व नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत मंत्रीपद मिळवले. ठाकरे गटाच्या पक्ष संघटनेच्या दृष्टीने ते सक्रिय नाहीत, ‘आपण आणि आपला नेवासे विधानसभा मतदारसंघ बरा’ या भूमिकेत ते आहेत. ठाकरे गटाने अलिकडेच श्रीगोंद्यातील युवानेते साजन पाचपुते यांची थेट उपनेतेपदी नियुक्ती केली. साजन पाचपुते हे भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे. काकांशी बंड पुकारत त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. मात्र उपनेतेपद मिळूनही ते श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाबाहेर लक्ष घालण्यास तयार नाहीत. ते शिवसेनेत नवीन आहेत, संघटनात्मक कामकाजाची माहिती करुन घेत आहेत, असे सांगत संपर्कप्रमुख आमदार शिंदे यांनी सारवासारव केली.

हेही वाचा – चर्चेतील चेहरा : विनोद तावडे.. राष्ट्रीय राजकारणातील संधी साधत दमदार वाटचाल

शिर्डीबरोबरच नगरचीही जागा लढवण्यास ठाकरे गट इच्छुक असल्याचे खासदार राऊत यांनी सुरुवातीला सांगितले असले तरी प्रत्यक्षात नगरच्या जागेची मागणी मेळाव्यात शिवसैनिकांनी केल्यावर मात्र त्यांनी या मागणीला बगल दिली. केवळ नगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जागा घेणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) दावा केलेला आहे. परंतु जागा कोणीही लढो, शरद पवार गट की ठाकरे गट, दोन्हीकडे सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

युतीच्या काळात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी जिल्ह्यात प्राबल्य निर्माण केले होते. स्वतंत्र लढताना दोन्ही पक्षांना जिल्ह्यात त्याचा फटका बसला. गेल्या निवडणुकीत तर राधाकृष्ण विखे यांच्यासारखे दिग्गज नेते पक्षात येऊनही भाजपची घसरगुंडी उडाली. शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. तरीही एकत्रित शिवसेना असताना आणि फुटीनंतरही ठाकरे गटाने नगर जिल्ह्याकडे संघटनात्मक पातळीवर फारसे लक्ष दिलेले नाही. आता आगामी लोकसभा आणि त्यानंतर लगेचच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा वेद घेत शिवसैनिकांना सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नगर जिल्ह्यातून किमान तीन ते चार आमदार निवडून द्या असा मनसुबा त्यांनी जाहीर केला.

Story img Loader