संतोष प्रधान

राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली असली तरी महाविकास आघाडीला तडा जाईल अशी कोणतीही कृती करणार नाही, अशी संयमी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. आघाडीची वज्रमूठ आपल्यामुळे सैल पडू नये अशी खबरदारी ठाकरे यांच्याकडून घेण्यात येत आहे.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Sanjay Raut slams Raj Thackeray (2)
Sanjay Raut on Raj Thackeray: ‘ते ठाकरे असतील तर मी राऊत’, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

‘लोक माझे सांगती’ या राजकीय आत्मकथेत शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा अनुभव कथन करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तिखट असे निरीक्षण नोंदविले आहे. ठाकरे यांच्याकडे राजकीय चातुर्याचा अभाव होता, मंत्रालयात ते दोनदाच गेले हे पचनी पडले नाही किंवा शिवसेना नेतृत्वाचे पक्षावर नियंत्रण नव्हते अशी काही निरीक्षणे ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर वैयक्तिक टीकाटिप्पणी करणारी आहेत. पवार यांची ही मते ठाकरे यांना झोंबणारी होती. उद्धव ठाकरे यांचा यापूर्वीची भूमिका लक्षात घेता ते आक्रमकेपणे प्रत्युत्तर देतील अशी शक्यता वर्तविली जात होती. पण ठाकरे यांनी संयम राखला आहे. आपल्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होणार नाही याची त्यांनी प्रामुख्याने खबरदारी घेतली आहे.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाला मद्य माफियाकडून दहा हजार कोटींचा मलिदा मिळाल्याचा भाजपाचा आरोप

पवार यांच्या पुस्तकानंतरच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांचे भवितव्य अधांतरी झाले. पुणे, नाशिक, अमरावती आणि कोल्हापूरमध्ये लवकरच सभा होणार होत्या. पण या सभा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. अवकाळी पाऊस आणि कडक उन्हामुळे या सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी सारवासारव तिन्ही पक्षांकडून करण्यात येत असली तरी आघाडीतील बिघाडी त्याला कारणीभूत ठरली आहे.

हेही वाचा >>>लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारातून बाहेर

वज्रमूठ सभांमध्ये उद्धव ठाकरे यांना मिळणारे महत्त्व किंवा त्यांच्यावर सारा प्रकाश राहात असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे चित्र निर्माण झाले होते. ही बाब दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना खटकत होती. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत यावर खल झाला. शेवटी या सभा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.

पवारांच्या टीकेवर ठाकरे यांनी तेवढेच जोरकसपणे प्रत्युत्तर दिले असते तर आघाडीतील कटुता अधिक वाढली असती. हे टाळण्याकरिताच ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गट खिळखिळा करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. अशा वेळी ठाकरे यांना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे. यामुळेच ठाकरे यांनी बोचरी टीका होऊनही संयम दाखविला आहे.