सुहास सरदेशमुख
छत्रपतीसंभाजीनगर : राज्यात १०० हून अधिक जागांवर शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) उमेदवार निवडणून यावे, अशा प्रकारची रणनीती आखली जात असून उमेदवारांचाही शोध सुरू केला असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली. ज्या मतदारसंघात ‘ गद्दारी’ झाली त्या मतदारसंघात ‘ खोके’ पोहचल्याची चर्चा सर्व स्तरातील व्यक्तीपर्यंत पोहचली आहे.त्यामुळे शिवसेना फोडून भाजपला जे साध्य करायला पाहिजे होते, ते त्यांना जमले नाही. उलट भाजपचीच बदनामी झाली.
शिवसेनेला मिळालेले सर्वाधिक यश लक्षात घेऊन कोणत्या मतदारसंघात अधिक ताकद लावायची यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. अनेक मतदार संघातील ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खरे तर सारे जण आता सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्या निकालावर सारे काही अवलंबून असणार आहे. शिवसेना हे जरी सध्या शिंदे गटाला मिळाले असले तरी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात चिन्हं व नाव मिळाले नाही तरीही शिवसेना पुढे जाणार आहेच. पण याचिकेवर किमान सुनावणी होऊन निकाल लागवा असे अपेक्षित आहे.त्यानंतर निवडणूक नियोजन सुरू होईल.
हेही वाचा… मुख्यमंत्रीपदावरून भाजपमध्येच गोंधळ
शंभरहून अधिक जागांवर लक्ष्य केंद्रीत करुन शिवसेनेचे नियाेजन सुरू आहे. ज्या मतदारसंघाचेनेते पक्ष सोडून गेले तेथील कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचेच नेतृत्व मानतात. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचाच कार्यकर्ता निवडूनयेईल. शिवाय अधिकच्या जागा मिळतील, असेही अपेक्षित असल्याचे दानवे म्हणाले.