प्रदीप नणंदकर

लातूर : ‘जमली तरी पक्षनिष्ठा नाही पक्षापासून सुटका’ या श्रेणीत अहमदपूरचे माजी आमदार विनायकराव पाटील यांच्याबरोबर आता उदगीरचे भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचेही नावही चर्चेत आले आहे. कधी काॅग्रेसमध्ये तर कधी अपक्ष अशी निवडणूक लढवून जिकडे सत्ता तिकडे विनायकराव हे गणित अहमदपूरच्या मतदारांना माहीत आहे. पण अनेक वर्षे भाजपशी एकनिष्ठ असणाऱ्या सुधाकर भालेराव यांच्याविषयी आता भाजपमध्ये नवनवीन चर्चा सुरू झाल्या आहेत.

Nitin Gadkari question is why caste is considered in elections
निवडणुकीतच जातीचा विचार का; नितीन गडकरी यांचा प्रश्न
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
BJP rebel Varun Patils decision to work for mahayuti in Kalyan
कल्याणमध्ये भाजप बंडखोर वरूण पाटील यांचा महायुतीचे काम करण्याचा निर्णय
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

सोयीचे गणिते या राजकीय सूत्राला आता मान्यता मिळाली आहे. सत्तेत जाण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या नेत्यांच्या रांगेत आता प्रत्येक विधानसभेत कार्यकर्तेही दिसू लागले आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व उदगीर या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील व संजय बनसोडे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले .दोन्ही आमदारांनी अजितदादांसमवेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाला मिळाली होती. नव्या तडजोडीमुळे विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना संधी दिली जाईल की भाजपा अजितदादां बरोबर तडजोड करेल असे प्रश्न उभे ठाकले आहेत .यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यात अस्वस्थता आहे.

हेही वाचा… ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ- चंद्रकांत पाटील या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

२०१७मध्ये अहमदपूर मधील अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून भाजपात प्रवेश केला होता. २०१९ मध्ये भाजपने उमेदवारी द्यावी या अटीवरच तो पक्षप्रवेश होता .अहमदपूर मतदारसंघात तेव्हा भाजपचे डझनापेक्षा अधिक कार्यकर्ते उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नरत होते . २०१९ मध्ये विनायकराव पाटील वगळता कोणालाही उमेदवारी द्या आम्ही सगळे एकत्रित राहून काम करू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले होते. मात्र, पक्षाने विनायकराव पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपातून दोघांनी बंडखोरी केली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील विजयी झाले.

हेही वाचा… विकासकामातील हस्तक्षेपाचा नगरमध्ये राजकीय गदारोळ

उदगीर विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये सुधाकर भालेराव हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मराठवाड्यात पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोनच आमदार निवडून आले होते. त्यानंतर २०१४ साली भालेराव निवडून आले. मात्र , २०१९ मध्ये भाजपमधील कुरघोडीतून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे भालेराव यांनी बंडखोरी करण्याचे ठरवले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला .२०१९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे विजयी झाले.

आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष श्रेणीतून लढवली तर दलित मुस्लिम मते आपल्याला मिळणार नाहीत असा कयास बांधून अहमदपूर मतदारसंघातील विनायकराव पाटील यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विनायकराव पाटील यांनी आपली सोय केली मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे काय , हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे.

हेही वाचा… स्थानिक स्वराज्य संस्थांतील ‘माधव’चे प्रतिनिधीत्व घटणार

उदगीर विधानसभा मतदार संघातील भाजपचे इच्छुक उमेदवार सुधाकर भालेराव यांनी पक्षाने आपल्याला अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद दिले आहे, पक्ष आपल्यावर अन्याय करणार नाही, याची आपल्याला खात्री असल्याचे ते सांगत आहेत . पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असल्याचाही त्यांचा दावा आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा काँग्रेस पक्षाची ताकद चांगली आहे.या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळते यावर पक्षनिष्ठा अवलंबून आहे. अशावेळी सुधाकर भालेराव काय करणार या प्रश्नावरुन भाजपमध्ये ‘ निष्ठा नाही तर पक्षापासून सुटका’ अशी नवी म्हण वापरली जात आहे.