उल्हासनगरः उल्हासनगरसारख्या लहानशा मतदारसंघात प्राथमिक प्रश्न सोडवण्यातही अपयशी ठरलेले उल्हासनगरचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना भाजपच्या पहिल्या यादीत स्थान मिळू शकलेले नाही. पहिल्या यादीला दोन दिवस उलटले तरी कुमार आयलानी यांना उमेदवारी मिळू न शकल्याने चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या स्थानिक सर्वेक्षणातही कुमार आयलानी मागे पडल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आयलानी यांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठाणे जिल्ह्यातील एक व्यापारी शहर आणि बहुसंख्य सिंधी समाजाची वस्ती म्हणून उल्हासनगर शहराची ओळख आहे. शहरात गेल्या काही वर्षात कोट्यांवधींचा निधी मंजूर झाला. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने शहरात जवळपास सर्वच प्राथमिक सोयीसुविधांची दयनीय अवस्था आहे. गेल्या पाच वर्षात विविध विभागांतून रस्त्यांसाठी कोट्यांवधींचा निधी मंजूर झाला. मात्र त्यांचा दर्जा न राखल्याने कॉंक्रिटी रस्त्यांनाही खड्डे पडले आहेत. शहरातील विविध चौक कोंडीत सापडले आहेत. शहरातील सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा कायमच सदोष राहिली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही शहरातील चौक पाण्याने भरलेले असतात. शहरातील जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्नही मार्गी लागू शकलेला नाही. शहरात दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. त्या समस्यांवर तोडगा काढण्यास स्थानिक आमदार कुमार आयलानी अपयशी ठरले. शहरातील पालिकेच्या निर्णयातही आयलानी छाप सोडू शकले नाही. वेळ मारून नेण्याचा हाच प्रकार आयलानी यांच्या अंगलट आल्याची चर्चा आहे. भाजपने रविवारी विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. मात्र यात कुमार आयलानी यांना जागा मिळू शकली नाही. या जागेवर आणखी काही नावांचा विचार केला जात असल्याचे बोलले जाते. तसेच भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातही कुमार आयलानी यांची उल्हासनगरची जागा धोक्यात असल्याचे निष्कर्ष आल्याची माहिती भाजपातील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आयलानी यांना पहिल्या यादीत स्थान दिले नसल्याचे बोलले जाते.

Pune MNS, MNS latest news, MNS Pune news,
नारा स्वबळाचा, वेळ उमेदवार शोधण्याची; पुण्यात ‘ताकद’ दाखविलेल्या ‘मनसे’ला नवसंजीवनी मिळण्याची प्रतीक्षा
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Thane constituency BJP, Shinde faction Thane,
ठाणे मतदारसंघ भाजपकडे कायम राहिल्याने शिंदे गटात अस्वस्थता
Anil Desai MP, Anil Desai, Anil Desai marathi news,
अनिल देसाईंची खासदारकी निर्भेळ, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
ratnagiri bjp workers not to work for shiv sena candidates
रत्नागिरी विधानसभेसाठी शिवसेनाच्या उमेदवारांचे काम न करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्णय, पक्ष बदलण्याचा निर्णय
politely battle in 46 assembly constituencies in Marathwada
मराठवाड्यात पुन्हा एकदा ‘ जोडू या अतुट नाती’ चा खेळ
Narendra Modi temple Pune, BJP party worker temple pune,
पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’
Chief Minister Eknath Shinde Shiv Sena challenges BJP leaders in Boisar Assembly Election 2024
मुख्यमंत्री शिंदे यांच्या खेळीने बोईसरमध्ये भाजप नेते अस्वस्थ

हेही वाचा >>>Navya Haridas: प्रियांका गांधींना वायनाडमध्ये तगडं आव्हान; RSS ची पार्श्वभूमी असलेली नव्या हरिदास केरळमध्ये कमळ फुलविणार?

कलानींच्या दावेदारीने भाजप संभ्रमात

उल्हासनगर मतदारसंघावर कलानी कुटुंबियांचा मोठा प्रभाव असतो. त्यातही कुमार आयलानी दोन विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आले. मात्र त्यातही २०१४, २००४ या निवडणुकांत आयलानी यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा सुरेश उर्फ पप्पू कलानी, ओमी कलानी एकाच वेळी निवडणुकांसाठी सज्ज आहेत. ओमी कलानी निवडणून लढण्याची शक्यता आहे. पप्पू कलानी प्रचाराची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा भाजपला येथे मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कलानी यांच्या तुलनेत चांगली प्रतिमा आणि नवा चेहरा द्यायचा का यावरही भाजपाच चर्चा होत असल्याची माहिती आहे.