विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने यात मतांचे गणित जुळवणे हे सर्वच उमेदवारांकरिता आव्हान असते.
मतांचा कोटा कसा ठरतो ?
एकूण मतदान भागीले जेवढ्या जागा आहेत त्यात एक अधिक करून भागाकार केल्यावर येणाऱ्या संख्येत .१ अधिक केल्यावर येणारी संख्या हा मतांचा कोटा असतो.
राज्य विधानसभेची सदस्यसंख्या २८८ असली तरी आमदारांचे राजीनामे, अपात्रता किंवा निधनामुळे १४ जागा सध्या रिक्त आहेत. परिणामी एकूण मतदार – २७४
२७४ भागीले ११ एक = २२.८३ १ = २२८४ (त्यातही वैध मतांच्या आधारे मतांचा कोटा ठरतो. एखादे मत बाद झाल्यास कोटा कमी होतो)
एका मताचे मूल्य हे १०० असते.
मतांचा कोटा हा शेकड्यात ठरतो. याचाच अर्थ २२८४ म्हणजेच पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता असेल.
दुसऱ्या पसंतीची मते कशी मोजली जातात ?
जेवढ्या जागा तेवढे पसंतीक्रम देण्याची आमदारांना मुभा असते. म्हणजे ११ जागांसाठी एखादा आमदार ११ पसंतीक्रमानुसार मते देऊ शकतो. १२ मते दिल्यास मतपत्रिका बाद होईल.
२२८४ मतांचा कोटा पूर्ण केलेला उमेदवार पहिल्या फेरीत विजयी घोषित केला जातो.
पहिल्या पसंतीची २६०० मते मिळालेल्या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात.
एक्स उमेदवाराला २६ तर वाय उमेदवाराला २० मते मिळाल्यास मते अशा पद्धतीने हस्तांतरित होतात.
‘एक्स’ उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची सर्व २६ मते ‘वाय’ उमेदवाराला मिळाल्यास अतिरिक्त मतांची भर पडते.
मतांचा कोटा – २२८४
एक्स उमेदवाराला मिळाली – २६०० मते
वाय उमेदवारांला सर्व २६०० मते हस्तांतरित झाली आहेत.
पण मतांचे मूल्य ठरते २६०० वजा २२८४ = ३१६
याचाच अर्थ ‘एक्स’ची ३१६ मते अतिरिक्त ठरली
पण ही मते हस्तांतरित होताना त्याचे मूल्य तेवढे नसते.
हेही वाचा…विधिमंडळाचे कामकाजही पाण्यात; मंत्री, आमदार, कर्मचारी अडकले; दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित
अतिरिक्त ३१६ मते भागीले पहिल्या पसंतीची २६ मते = १२.१५ (वरील .१५ मते गृहित धरली जात नाहीत)
-१२ मतांचे मूल्य ठरविले जाते
-पहिल्या पसंतीची २६ मते गुणिले १२ = ३१२ प्रत्यक्ष मतांची भर पडते
-वाय उमेदवाराला पहिल्या पसंतीची २००० मते मिळाली असल्यास त्यात ३१२ मतांची भर पडते.
वाय उमेदवाराची मते २३१२ झाल्याने २२८४ मतांचा कोटा पूर्ण केल्याने तो विजयी ठरू शकतो.
समजा वाय उमेदवाराला २२८४ मतांचा कोटा पूर्ण करता आला नसता तर दुसऱ्या उमेदवाराला २२८४ पेक्षा अधिक मते मिळाली आहेत त्याची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात.
-दुसऱ्या उमेदवाराची मते मोजूनही अपेक्षित मते न मिळाल्यास तिसऱ्या उमेदवाराची मते मोजली जातात
-मतांचे हे गणित एकदम किचकट असते