ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला गेला असून येथून भाजपने विद्यमान आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊ केल्याने महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी अद्याप भूमिका जाहीर केली नसून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतल्यास महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविलेले राजन विचारे हे विजयी झाले होते. त्यावेळी शिवसेना एकसंघ आणि भाजपासोबत युती होती. २०१४ मध्ये मात्र शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात ठाणे शहर मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत भाजपचे संजय केळकर हे विजयी झाले. २०१९ साली झालेल्या निवडणुकीतही केळकर यांनी विजय संपादन केला. या मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर हे सलग दोनदा निवडून आले आहेत. असे असले तरी यंदाच्या निवडणुकीत केळकर यांना उमेदवारी दिली जाणार नाही अशी चर्चा रंगली होती.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

हेही वाचा – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी डोंबिवलीत

संजय केळकर यांनी आमदार असताना महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराविषयी आवाज उठविला होता. पालिकेत शिंदेच्या सेनेची आजवर सत्ता राहिली आहे. त्यामुळे युतीत असतानाही केळकर यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप करून कोंडी केली जात असल्याने शिंदेच्या शिवसेनेतील एक गट नाराज होता. यातूनच ही जागा शिंदेच्या सेनेने आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी ‘दादाचं काम बोलतंय’असे फलक ठाणे शहर मतदारसंघात जागोजागी लावत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. भोईर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन मतदारसंघावर दावाही केला होता आणि निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. यामुळे या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे असतानाच, हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला गेला आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊ केल्याने भोईर आणि त्यांच्या समर्थक अस्वस्थ झाले आहेत. तसेच केळकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नव्हती. तसेच संजय भोईर यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नसली तरी ते निवडणूक लढविण्यासाठी बंडखोरी करतील, असे बोलले जात आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा या भागात माजी नगरसेवक संजय भोईर यांचे चार नगरसेवक निवडून आले होते. या भागातील प्रभावी राजकीय प्रस्थ म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतल्यास महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांच्या पत्नीला, उमेदवारी दिल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता

बाळकुम भागातील प्रभावी राजकीय प्रस्थ असलेले माजी नगरसेवक देवराम भोईर हे २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षात होते, त्यावेळी त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत १५ हजारहून अधिक मते मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र संजय भोईर हे शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावर ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु महायुतीच्या जागा वाटपात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने भोईर बंडखोरी करणार की तलवार म्यान करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader