गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी भाजपाकडून रणनिती आखण्यात येत आहे. यासाठी अमित शाह अहमदाबादेसह त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमध्ये चार दिवस मुक्कामी होते. उमेदवारांची अंतिम यादी, बंडखोरांना शांत करण्यासह त्यांनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या प्रचारसभेत हजेरी लावली होती.

Gujarat Election: “…तर मी कोणालाही गोळी घालेन”, बंडखोर भाजपा आमदाराची भर सभेत धमकी

Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kiren Rijiju criticized pm modi said PM Modi targets Congress
मोदींनी संसदेला ओलीस ठेवले होते…काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने…
nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
Bawankule called meeting to make history in deoli assembly constituency
कामाला लागा आणि इतिहास घडवा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात,‘…तर खैर नाही’
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”

विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आलेल्या तीन मतदारसंघामध्ये रात्री उशिरापर्यंत शाह यांनी बैठका घेतल्या. गांधीनगरमधील पाच विधानसभा मतदारसंघात अमित शाह यांनी गुजरात दौऱ्यादरम्यान मोर्चेबांधणी केली. गांधीनगरमध्ये विधानसभेच्या एकूण सात जागा आहे. यामध्ये भाजपाच्या पाच तर काँग्रेसच्या दोन जागांचा समावेश आहे. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये खासदार झाल्यानंतर या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अमित शाह यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. गांधीनगरमधील सातही जागा जिंकण्याचं शाह यांचं लक्ष्य आहे.

Gujarat Election: “आम आदमी पार्टी शर्यतीत नाही, मुख्य लढत भाजपा-काँग्रेसमध्ये होणार” अमित शाहांचं मोठं विधान

गुजरातमध्ये दिग्गजांना तिकीट नाकारल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यात शाह आघाडीवर आहेत. उमेदवारी न मिळाल्यानं अनेक नेत्यांमध्ये रोष आहे. भाजपाच्या तीन नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा इशाराही दिला आहे. अशात शाह यांचा गुजरात दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

Gujarat Election: “ शासकीय कार्यालयांमधील मोदींचे फोटो काढा किंवा झाका”; ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे मागणी

गांधीनगरमधून १९८९ मध्ये शंकरसिंह वाघेला यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ सालापासून या मतदारसंघाचं नेतृत्व अमित शाह करत आहेत. शंकरसिंह वाघेला यांच्यानंतर शाह निवडून येईपर्यंत या मतदारसंघाचं नेतृत्व गुजरातबाहेरील व्यक्तींनी केलं. माजी उपपंतप्रधान एल. के. आडवाणी यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. १९९६ साली याच मतदारसंघातून दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विजय मिळवला होता. त्याकाळी सारखेज मतदारसंघातून आमदार असलेले अमित शाह आडवाणी यांचे निवडणूक व्यवस्थापक होते.