एजाज हुसेन मुजावर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोलापूर : स्वतःच्या मतलबी राजकारणामुळे पक्षाबरोबर स्वतःलाही फटका बसला. त्याचा भाजपसारख्या पक्षाला चांगलेच फावले. आता त्याचा सर्वानाच पश्चाताप झाल्यानंतर एरव्ही, एकमेकांना पाण्यात पाहणारी नेते मंडळी आता स्वतःच्या अस्तित्वासाठी पुन्हा एकत्र आली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे शिवसेनेच्या नेते मंडळींना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता तो काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी. सर्वांनी एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेत दक्षिण सोलापूरचे आमदार, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पराभवाचा विडा उचलला आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन्ही काँग्रेसला लक्षणीय मिळाले. भाजपला निराशा पत्करावी लागल्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असतानाच दोन्ही काँग्रेससह उध्दव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी तालुक्यातील नूतन सरपंच व उपसरपंचांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने निंबर्गी गावात मांडीला मांडी लावून ऐक्याची एक्सप्रेस सुरू केली. मागील २०१९ साली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तत्कालीन राजकीय वा-यांचा अंदाज घेऊन काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आणि अपयशी ठरलेले माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अक्कलकोटचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते आप्पाराव कोरे, अमर पाटील आदी मंडळींनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या साक्षीने एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.
हेही वाचा >>> चंद्रकांत खैरे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत!
एकेकाळी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असलेला दक्षिण सोलापूर तालुक्याला दिवंगत सहकार नेते, माजी आमदार वि. गु. शिवदारे, माजी मंत्री आनंदराव देवकते आदी मातब्बर नेत्यांचे नेतृत्व अनेकदा वर्षे लाभले होते. २००३ साली ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर याच दक्षिण सोलापूर तालुक्यातून विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते. २००९ साली दिलीप ब्रह्मदेव माने यांचे आमदारकीचे घोडेही याच मतदारसंघातून न्हाऊन निघाले होते.
हेही वाचा >>> तेलंगणात केसीआर यांना मोठा धक्का? BRSचा तगडा नेता अमित शाहांची भेट घेणार
तथापि, पुढे तालुक्यातील राजकारणात फंदफितुरी सुरू झाली. एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती वाढली. त्याचा फटका पंचायत समिती, जिल्हा परिषद, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सर्वानाच सहन करावा लागला. याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी तालुक्यात आपले पाय रोवायला सुरूवात केली होती. भंडारकवठे परिसरात स्वतःच्या लोकमंगल साखर कारखान्याच्या माध्यमातून देशमुख स्थिरावले होते. दरम्यान, देशात २०१४ साली मोदी लाट आली आणि भाजपचे देशमुख हे विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यावर मात करून निवडून आले. पुढील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीतही देशमुख यांना आपली जागा कायम राखायला जास्त कष्ट घेण्याची गरज निर्माण झाली नव्हती. कारण दिलीप माने यांनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.
एवढेच नव्हे तर त्यांनी दक्षिण सोलापूरऐवजी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणे पसंत केले होते. परंतु ते साफ अपयशी ठरले. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशीच त्यांची अडचण झाली. तद्पश्चातही शिवसेनेत न रमलेले माने यांनी राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते. परंतु घडाळ्याचे काटे फिरून राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येताच माने यांच्या अडचणीत आणखी भर पडली. सध्या ते कोणत्या पक्षात आहेत, याचे कोडेच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने माने यांनी पुन्हा दक्षिण सोलापूर तालुक्यात पूर्णवेळ लक्ष घालून स्वतःची ताकद वाढविली आहे.
भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना धक्का बसल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दिलीप माने यांचा हुरूप वाढला आहे. स्वतःच्या ताकदीवर सुभाष देशमुख यांचा वारू रोखता येणार नाही, या जाणीवेने, आपल्यापासून दुरावलेल्या नेत्यांना जवळ करून ऐक्याची मोट बांधणे दिलीप माने यांना आता अपरिहार्य वाटू लागले आहे. त्याची सुरूवात त्यांनी केली आहे. इकडे आमदार प्रशाला शिंदे यांनीही झाले गेले विसरून दिलीप माने यांच्याशी जुळवून घेत ऐक्याचा हात पुढे केला आहे. दिलीप माने हेदेखील काँग्रेसमध्ये परतणार काय, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे.